शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळली; समोर मृत्यू पाहिलेले चौघे बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:45 IST

मुरुड शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

मुरुड : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानकपणे एका कारवर कोसळली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील चौघे बालंबाल बचावले. ही घटना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस ट्वेंटी- ट्वेंटी साखर कारखान्यास ट्रॅक्टर (एमएच २४, एडब्ल्यू ५१४९) च्या ट्रॉलीतून मुरुडमार्गे सोमवारी नेण्यात येत होता. हा ट्रॅक्टर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. तेव्हा चालक ट्रॅक्टर वळवत असताना पाठीमागील ट्रॉली उभ्या असलेल्या असलेल्या कार (एमएच २४, बीआर ०५७७) वर अचानक कोसळली. ट्राली कोसळत असल्याचे पाहून कारमधील चालकाने प्रसंगावधान राखत वाहन पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारमधील चौघे बालंबाल बचावले. या घटनेत कारचे नुकसान झाले.

वाहतूक ठप्प...या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

खड्ड्यांमुळे अपघात...मुरुड शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला डॉ. आंबेडकर चौकातून सहजरीत्या वाहन वळवून राष्ट्रीय महामार्गावर घेऊन जाता येत नाही. परिणामी, सतत अपघात होत आहेत. तसेच वाहतूक कोंडीही होत असते. प्रशासनाने शहरातील खड्डे तत्काळ बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Sugarcane tractor-trolley collapses on car; four survive near-death experience!

Web Summary : In Murud, a sugarcane tractor-trolley overturned onto a car, causing significant damage. Fortunately, all four occupants escaped unharmed due to the driver's quick reaction. The incident disrupted traffic, highlighting the need for road repairs due to potholes.
टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर