शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
2
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
3
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
4
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
5
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
6
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
7
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
8
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
9
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
12
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
13
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
14
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
15
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
16
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
17
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
18
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
19
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
20
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

Latur: खरेदीचा ‘सुवर्ण’याेग..! साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी, काेट्यवधींची उलाढाल

By राजकुमार जोंधळे | Updated: October 12, 2024 21:24 IST

Latur: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले.

- राजकुमार जाेंधळे लातूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले.

सराफा बाजारात साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. अनेकांनी विजयादशमीला ‘साेन्या’ची लूट केली. परिणामी, जिल्ह्यातील सराफा बाजारात काेट्यवधींची उलाढाल झाली. इकडे वाहन आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. अनेकांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न साकार केले.

वर्षभरात साेन्या-चांदीत २० हजारांची झाली वाढ गत वर्षभरात साेन्या-चांदीच्या दरात माेठी तेजी आहे. जवळपास १५ ते २० हजार रुपयांनी दर वधारले आहेत. शनिवारी साेने प्रतिताेळा ७६ हजार ५०० रुपयांवर (जीएसटीसह ७८ हजार ८०० रुपये) पाेहचले हाेते. चांदी प्रति किलाे ९३ हजार ६०० रुपयांवर (जीएसटीसह ९४ हजार २०० रुपये) पाेहचले हाेते.

दुपारनंतर लातूर सराफा बाजारात खरेदीचा उत्साह दुपारी १२ नंतर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली अन् ८० हजारांच्या घरात पाेहचलेल्या साेन्याचा खरेदीचा उत्साह ग्राहकांच्या चेहऱ्यावर कायम असल्याचे दिसून आले. दिवसभरात साेन्या-चांदीच्या खरेदीतून सराफा बाजाराने काेट्यवधींचे ‘सीमाेल्लंघन’ केले.

वाहन बाजारात तेजी...रिअल इस्टेटही जाेरात विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात माेठी तेजी हाेती. अनेकांनी वाहनांची खरेदी करून घरी नेले आणि विधिवत पूजन केले. बांधकाम क्षेत्रात अनेकांनी आपल्या स्वप्नातील घरांचे बुकिंग, खरेदी करून सुवर्णयाेग साधला.त्याचबराेबर काहींनी प्लाॅट, राे-हाऊस, फ्लॅट खरेदीला प्राधान्य दिले. काहींनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्या घरात पाऊल ठेवले. गत पाच वर्षात साेन्या-चांदीच्या दरात माेठी दरवाढ झाली आहे, तर रिअल इस्टेटमधील मालमत्तांचे दरही दुपटीवर पाेहचले आहेत.

असे वाढले साेन्याचे दर 

वर्ष --------------- साेने प्रतिताेळा२०१९ ------------- ३५,०००२०२० ------------- ४८,६००२०२१ ------------- ४९,१३०२०२२ ------------- ५१,८६०२०२३ ------------- ६१,२००२०२४ ------------- ७९,०००

टॅग्स :GoldसोनंDasaraदसराlaturलातूर