शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कुस्ती लीग स्पर्धेत घुमणार लातूरचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:51 PM

लातूरच्या कुस्तीपटूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत.

- महेश पाळणे 

लातूर : राज्यभरातच नव्हे, तर देशभरात लातूरच्याकुस्तीची ओळख परिचित आहे. लातूरच्या कुस्तीपटूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत. या खेळात लातूरचा नेहमीच बोलबाला असतो. आता नव्याने होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेसाठी लातूरच्या काका पवारसह सागर बिराजदार व पंकज पवारची वर्णी लागली आहे. त्यामुळे या स्पर्धेतही लातूरचा आवाज नक्कीच घुमणार. 

लातूरच्या कुस्तीने अनेक रत्ने घडविली आहेत. त्यामुळे लातूरचे नाव कुस्तीत दूरवर पोहोचले आहे. ध्यानचंद, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनेक मल्ल लातूरने दिले आहेत. त्यामुळे लातूरच्या खेळाडूंचा दबदबा आहे. २ ते १८ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग स्पर्धा होणार आहे. 

या स्पर्धेत सहा संघ राहणार असून, राज्यातील अव्वल दर्जाचे ७२ खेळाडू यात आपले कसब पणाला लावणार आहेत.  ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारेसह ज्योतिबा अटकळे, माऊली जमदाडे, उत्कर्ष काळे, विक्रम कुºहाडे, कौतुक ढाफळे, किरण भगत हे अव्वल मल्ल यात सहभागी राहणार आहेत. यामध्ये लातूरच्या सागर बिराजदार व पंकज पवार या दोन खेळाडूंचा समावेश असून, स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अर्जुनवीर काका पवार हे राहणार आहेत. 

विविध वजन गटात ही स्पर्धा होणार असून, विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंना या लीग स्पर्धेमुळे मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. एकंदरित, या कुस्ती लीग स्पर्धेत लातूरचा आवाज घुमणार आहे. 

सई ताम्हणकरच्या संघात सागर... कोल्हापुरी मावळे नावाने असलेला संघ मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा असून, या संघात ८६ किलो वजनी गटात लातूरचा सागर बिराजदार प्रतिनिधित्व करणार आहे. यासह साईचा पंकज पवार पुणेरी उस्ताद संघात राहणार आहे. या स्पर्धेत वीर मराठवाडा संघ मालक म्हणून नागराज मंजुळे राहणार आहेत. यासह अभिनेते स्वप्नील जोशी यांचाही संघ ‘विदर्भाचे वाघ’ या नावाने असणार आहेत. 

गुणवान खेळाडू... रामलिंग मुदगडचा सागर बिराजदार मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅट विभागात उपविजयी ठरला आहे. यासह अखिल भारतीय विद्यापीठ व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकाविले आहे. यासह साईचा पंकज पवार याने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले आहे. १९ वर्षे वयोगटात तो राज्याचा बेस्ट रेसलर म्हणून उदयास आला आहे. 

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती