शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लातूर हादरलं! शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यावर वसतिगृहासमोरच चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, ३ जखमी.

By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2026 00:24 IST

Latur Crime : पूरणमल लाहाेटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर साेमवारी सायंकाळी औसा राेडवर ...

Latur Crime : पूरणमल लाहाेटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर साेमवारी सायंकाळी औसा राेडवर वसतिगृहासमाेरच चाकू हल्ला झाला. त्यात एकजण जागीच ठार झाला असून, तिघा जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुख्य आरोपी महाविद्यालयाबाहेरचा असून, त्याच्यासोबतचे तीन आरोपी मात्र पॉलिटेक्निकचेच विद्यार्थी आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील औसा राेडवर साेमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चार जणांनी २१ वर्षीय विक्रम नारायण पांचाळ या तरुणावर चाकूने हल्ला केला. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. घाबरलेल्या स्थितीत तरुणांनी हल्ला करणाऱ्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाेर येणाऱ्या तरुणांवरही शस्त्राने वार केले. त्यात अदित्य भारत साडे (वय २०), सुजल बलभीम रेड्डी (२०) व एका १७ वर्षीय मुलावर चाकूचे वार केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.घटनेची माहिती मिळताच अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पाेलिस अधिकारी समीरसिंह साळवे, पाेलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे गतिमान केली.

तासाभरात आरोपी जेरबंद...

घटना समजल्यानंतर पोलिसांची पथके चारही दिशेने रवाना झाली. पार्श्वभूमी कळल्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत तासाभरात पोहोचले. त्यात ताब्यात घेण्यात आलेले तिघेजण पॉलिटेक्निकचेच विद्यार्थी आहेत. तर ज्याने सर्वांवर सपासप चाकू फिरवला, तो बाहेरचा युवक असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविला जाईल. - समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर

प्रकरण चाकूहल्ल्यापर्यंत कसे गेले?

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी आहेत. त्यांच्यात वेगवेगळ्या कारणाने गटबाजी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, काही दिवसांपूर्वी वसतिगृहात एक गाडी फोडली होती. त्याचा आळ आपल्यावर येईल आणि मारहाण होईल, या शंकेने त्याने बाहेरून एका युवकाला बोलावून घेतले. तो चाकू घेऊनच आला. सोबत आणखी दोघे विद्यार्थी असे एकूण चौघेजण घटनास्थळी होते. त्यातील बाहेरून आलेल्या युवकाने चाकूहल्ला केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विक्रमवर दुर्दैवी हल्ला...

वसतिगृहातील गटबाजी वा कोणत्याही प्रकरणाशी विक्रम पांचाळ याचा संबंध पोलिसांना आढळून आलेला नाही. विक्रमची चूक नसताना आरोपीने चौघांवर केलेल्या चाकूहल्ल्यात त्याला नाहक जीव गमवावा लागला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे म्हणाले, प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Shaken: Student Killed, Three Injured in Knife Attack

Web Summary : In Latur, a student was killed and three others injured in a knife attack near a polytechnic hostel. Police arrested the suspects, including students and an outsider, linking the attack to hostel rivalry. Investigation is underway.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी