शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर हादरले! आईचा खून करून उसाच्या शेतात पुरला मृतदेह; नंतर मुलानेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:13 IST

शेती विक्रीच्या वादातून कुटुंबाची शोकांतिका; माय-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार

रेणापूर (जि. लातूर) : शेती विक्रीस विरोध करीत असलेल्या वयोवृद्ध आईचा खून करून मुलानेही आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मृत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगवी येथील काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय ४८) याने रेणापूर पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर काही तासांतच त्याच्या आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री ९ वाजेच्या सुमारास आढळून आला. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली. शुक्रवारी मृताचा मुलगा व आजीचा नातू शुभम काकासाहेब जाधव यांनी रेणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरलामाझे वडील काकासाहेब जाधव हे आजीकडे वारंवार शेत विक्री करावयाचे आहे म्हणत होते. मात्र, त्यास आजी विरोध करत होती. त्यामुळे आजी समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय ८०) यांना वडील काकासाहेब यांनी जबर मारहाण केली तसेच तोंड दाबून जिवे मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतातील उसाच्या फडात आजीचा मृतहेद पुरला. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात मृत काकासाहेब जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

माय-लेकावर एकत्र अंत्यसंस्कारमुलगा काकासाहेब वेणुनाथ जाधव व आई समिंद्रबाई वेणुनाथ जाधव यांच्या मृतदेहाची रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी दोन्हीही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सांगवी येथे माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकच मुलगा, चार मुलीसमिंद्रबाई जाधव यांना चार मुली व एक मुलगा होता. सर्वांचेच लग्न झाले आहे. मुलगा काकासाहेब यानेच आई जमीन विक्री करू देत नसल्याने तिचा खून केला अन् स्वत:नेही गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी चारही मुलींनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर