शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Latur: कलकोटीत लाभार्थ्यांना लाभ न देता लाखोंचा घोटाळा; 'नरेगा'चा तांत्रिक सहायक कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:21 IST

या प्रकरणात पूर्वी ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले होते, तसेच सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

संदीप अंकलकोटेचाकूर : तालुक्यातील कलकोटी येथील ग्रामपंचायत अंतर्गत कामात लाभार्थ्यांना लाभ न देता लाखो रुपयांचा घोटाळा करून अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीचा अहवाल आणि पंचायत समिती केलेली चौकशी यात नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना अपहार केल्याचा ठपका ठेवून पंचायत समितीतून कार्यमुक्त केले आहे.

प्राथमिक चौकशी अहवालानुसार कलकोटी येथील महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावर गोठा बांधकामाचे लाभार्थी नारायण कोंपले, मधुकर कोपले, उद्धव कोंपले, बालाजी कोंपले, सुधाकर केंपले यांचे सर्व उपलब्ध अभिलेख संबंधाचे जबाब व स्थळपाहणी करण्यात आली. सदरील कामाच्या स्तरावरील जिओ टॅगमध्ये आढळून आलेला गैरप्रकार यावरून सदरील कामावर निधी खर्च झाल्याचे दिसून आले. मात्र स्थळपाहणी, लाभार्थ्यांच्या जबाबानुसार सदरील काम पूर्ण झाल्याचे आढळून आलेले नाही. तसेच तालुक्यातील बावलगाव, अजनसोंडा (बु) येथील कामांमध्ये अपहार झाल्याचे दिसून आले आहे, असे पत्र पंचायत समितीने नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना दिले आहे.

काय म्हटले आहे आदेशातसर्व मस्टर जिओ टॅग कार्यक्षेत्रातील प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्यक त्या क्षेत्रभेट, कागदपत्रे गोळा करणे, ग्रामपंचायतीतील दिलेले कामाचे प्रमाण राखणे, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक तसेच लाभार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे, लाभार्थ्यांचे अचूक मोजमापे घेणे, मूल्यांकन करणे, मजूर, हजेरी पत्रक, कामाची मोजमाप पुस्तिका, अभिलेखे पंचायत समिती स्तरावर प्राधान्याने बिनचूक सादर होतील, या दृष्टीने कार्यवाही करणे. या पद्धतीने कामकाज करणे विहित असताना देखील त्याप्रमाणे कामकाज न करता जाणीवपूर्वक अनियमितता झाल्याचे सिध्द होत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी केली कारवाईशासन परिपत्रकाचे अनुपालन न करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, झालेल्या अपहाराबाबत नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना जबाबदार धरून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी तांत्रिक सहायक धैर्य यांना कार्यमुक्त केले आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपस्थित राहून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. उपोषणकर्त्यांनी जी मागणी लावून धरली होती त्यात प्रथमदर्शनी अपहार झाल्याचे आता उघड झाले आहे.

चौकशी सुरूचया प्रकरणात पूर्वी ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले होते, तसेच सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणात अजून कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मागणीची चौकशी येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन चौकशी अधिकारी तथा लातूरचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले यांनी दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: NREGA technical assistant removed amid fraud allegations.

Web Summary : A technical assistant in Latur's NREGA scheme has been removed following allegations of misappropriating funds meant for beneficiaries. An inquiry revealed irregularities in construction projects, leading to the action by the Panchayat Samiti. Further investigation is underway.
टॅग्स :laturलातूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी