लातूर रोड- बोधन रेल्वे मार्गाच्या निधीसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:03+5:302021-07-27T04:21:03+5:30
लातूररोड- बोधन रेल्वे मार्गासाठी यापूर्वी जळकोट तालुका रेल्वे संघर्ष समिती व जळकोट तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तत्कालिन रेल्वेमंत्री ...

लातूर रोड- बोधन रेल्वे मार्गाच्या निधीसाठी प्रयत्न करणार
लातूररोड- बोधन रेल्वे मार्गासाठी यापूर्वी जळकोट तालुका रेल्वे संघर्ष समिती व जळकोट तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तत्कालिन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. या १३० कि.मी.च्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, रेल्वेमार्गासाठी निधी उपलब्ध झाला नाही.
माजी आ. गोविंद केंद्रे म्हणाले, मराठवाड्याचे सुपुत्र रेल्वे राज्यमंत्री असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या मार्गावर कुठेही पर्वतरांगा अथवा नद्या नाहीत. भौगोलिकदृष्ट्या हा मार्ग कमी पैशात होणारा आहे. हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर झाल्यास जळकोट, मुखेड, चाकुर, कंधार, नरसी, नायगाव, बिलोली, देगलूर या तालुक्यांचा विकास होणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी आ. गोविंद केंद्रे यांनी सांगितले.