लातूर रोड- बोधन रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:17 IST2020-12-08T04:17:03+5:302020-12-08T04:17:03+5:30
रेल्वे संघर्ष समिती व जळकोट येथील पत्रकार संघाच्या वतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन ...

लातूर रोड- बोधन रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी
रेल्वे संघर्ष समिती व जळकोट येथील पत्रकार संघाच्या वतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. तेव्हा सदरील रेल्वे मार्गाचा सेटलाईटद्वारे सर्व्हे करण्यात आला होता. परंतु, निधी उपलब्ध न झाल्याने या मार्गाचे काम रखडले आहे.
हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा असून लातूरराेड, जळकोट, जांब, मुखेड, नरसी व बोधनपर्यंत हा रेल्वे मार्ग जाणार आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणार असून भौगोलिकदृष्टया हा रेल्वे मार्ग सरळ आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गावर डोंगर, नदी, नाले नसल्यामुळे निधी कमी लागणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाला तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, रिपाइं आदींनी केली आहे.