शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला

By आशपाक पठाण | Updated: June 18, 2024 19:38 IST

पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ

लातूर  : मागील आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल २१ टक्के जलसाठ्यात वाढ झाली असून मध्यम प्रकल्पामध्ये २२.४९ जलसाठा झाला आहे. जलसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून यांचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. शिवाय, घनसरगाव, रेणापूर, खरोळा, पोहरेगाव सह इतर बॅरेजेस मध्ये जलसाठा झाला आहे.

रेणापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून रेणा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे. शिवाय, सिंचनासाठी हजारो शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी मदत होते. पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान असलेल्या रेणा मध्यम प्रकल्पात ७ जूनपर्यंत केवळ १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तसेच परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. शिवाय, उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा झाल्याने या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून तालुक्यात दररोज पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जलसाठे वाढले आहेत.

पावसामुळे वाढत गेला जलसाठा...

रेणा मध्यम प्रकल्प १० जून २ टक्के पाणीसाठा वाढल्याने ३.४० टक्के पाणी होता. ११ जून रोजी दिवसभर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात राहिल्याने एक दिवसात तब्बल १६ टक्क्यांनी पाणी वाढले. परिणामी एकूण पाणीसाठा ५.१६८ द.लघमी इतका झाला. तर पाण्याची टक्केवारी १९.६५ झाली. १२ जून रोजी २ टक्के वाढ झाली असून त्यानंतर १८ जूनपर्यंत पाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू होती. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.६२४ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी झाला आहे.

प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस...मागील ८ ते १० दिवसांमध्ये रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्र परिसरात मोठा पाऊस पडल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. जलसाठा वाढल्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार असल्याचे रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊस