महिला, मुलींवरील अत्याचाराचा लातुरात निषेध; हाताला बांधली काळी पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:49+5:302021-09-15T04:24:49+5:30

''अरे माणसा.... माणसासारखा वाग..'' असे फलक हातात घेऊन तरुणांनी महिला अन मुलींवरील अत्याचाराचा यावेळी निषेध केला. राज्यात आणि देशात ...

Latur protest against atrocities against women and girls; Hand-tied black band | महिला, मुलींवरील अत्याचाराचा लातुरात निषेध; हाताला बांधली काळी पट्टी

महिला, मुलींवरील अत्याचाराचा लातुरात निषेध; हाताला बांधली काळी पट्टी

''अरे माणसा.... माणसासारखा वाग..'' असे फलक हातात घेऊन तरुणांनी महिला अन मुलींवरील अत्याचाराचा यावेळी निषेध केला. राज्यात आणि देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत गत काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ''महिला-मुलींवरील रोज होतोय अत्याचार, माणसामधला जागा झाला राक्षस अन तोच करतोय बलात्कार'', अत्याचार घटनांचा तीव्र निषेध, मन हेलवणाऱ्या घटनांचा तीव्र निषेध असे मजकूर लिहिलेले फलक हातात घेत मनपाच्या पार्कवर मंगळवारी निषेध नोंदवला. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांत बलात्कार घटनांत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सामूहिक पद्धतीने बलात्कार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनांचा रोखण्यासाठी बलात्काऱ्यांना जागेवर फाशी देण्याची गरज आहे.

या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी हातात फलक घेत काळ्या फिती बांधल्या. या निषेध आंदोलनात वसुंधरा प्रतिष्ठान कोअर कमिटीचे कार्यकारी प्रमुख अमोलअप्पा स्वामी, अध्यक्ष अॅड. अजित चिखलीकर, वृक्ष लागवड अन संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर, सदस्य प्रवीण कुंभार, सतीश घोटेकर, सचिन चिखले, अजय वळसने, प्रसाद कुंभार, विठ्ठल सातपुते, रोहित शर्मा, ऋषभ मेखले यांनी सहभाग घेतला.

Web Title: Latur protest against atrocities against women and girls; Hand-tied black band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.