शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: पाेलिस पथक गावात धडकले; गुंगारा देत आराेपी पसार झाले, ३० ताेळ्यांचे दागिने जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: December 17, 2024 22:32 IST

Latur Crime News: शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली.

- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली. तेथे छापा मारून पाेलिसांनी ३० ताेळे साेने जप्त केले आहे. ‘त्या’ पाहुण्याच्या गावात पाेलिस धडकले...अट्टल गुन्हेगार मात्र गुंगारा देत पसार झाले.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील मंगल कार्यालयात साखरपुड्याची धामधूम सुरू हाेती. यावेळी अज्ञातांनी दागिन्यांची बॅग पळविली. पाेलिसांकडून जिल्हा, राज्यासह परराज्यांतील रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती एकत्रित केली. त्यातच खबऱ्यानेही माहिती दिली. दागिने चोरणारी टाेळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडा गावाची असल्याची माहिती समाेर आली. याची खातरजमा केली असता, ती खरी असल्याचे समाेर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशातील गावाकडे रवाना झाले.

मध्य प्रदेशात आठ दिवसांचा मुक्काम अन् दाेन हजार किलाेमीटरचा प्रवास...लातूर ते मध्य प्रदेशातील राजगड असा तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास पाेलिसांनी केला. मध्य प्रदेशात आठ दिवस त्यांनी मुक्काम ठाेकला. याच मुक्कामात त्यांनी आरोपींचा शोध लावला. चोरलेल्या मुद्देमालाबाबत अचूक व सखोल माहिती मिळवली.

नातेवाईक महिलेच्या घरी ‘ती’ साेन्याची बॅग लपविली...सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया (वय २०), मेहताब नथूसिंग सिसोदिया (२५, दाेघही रा. हुलखेडी, ता पाचोर, जि. राजगड, मध्य प्रदेश) आणि कालू बनवारी सिसोदिया (२०, रा. कडिया, ता. पाचोरा, जि. राजगड, मध्य प्रदेश) यांनी साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० तोळे सोन्याची बॅग चोरून ती एका नातेवाईक महिलेकडे ठेवल्याचे समजले. या महिलेकडून ३० तोळे दागिन्याची बॅग पाेलिसांनी जप्त केली.

पाेलिसांचा सुगावा; तीन आराेपी पळाले...लातूरचे पोलिस पथक गावात दाखल झाल्याचा सुगावा लागताच टाेळीतील तीन सराईत चाेरटे पसार झाले. त्यांच्या मागावर पाेलिस पथक असून, शोध घेतला जात आहे. शिवाय, गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल एमआयडीसी पाेलिस ठाण्याकडे जमा करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पोउपनि. राजपूत हे करीत आहेत.

लातूर येथील पाेलिस पथकाने केली कारवाई...जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी तपासाचे आदेश दिले. अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, राहुल सोनकांबळे, खुर्रम काझी, युवराज गिरी, मुन्ना मदने, विकास नळेगावकर, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक हीना शेख, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुळे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी