शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

अवैध व्यवसायावर लातूर पााेलिसांचे 'ड्रोन' स्ट्राईक !

By राजकुमार जोंधळे | Updated: November 10, 2024 20:43 IST

एकाच ठिकाणी उभे राहून केली टेहाळणी...

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यासील अवैध व्यवसायावरे लातूर पाेलिसांनी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्राेन स्ट्राईक केला आहे. या अनाेख्यवा कारवाईने जिल्ह्यातील अवैध व्यवाय करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

लातूर जिल्हा पोलिसांनी अनेकदा अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली असून, गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र, या व्यवसायातील गुन्हेगार नवनवीन मार्ग, फंडा शाेधत अतिशय अडगळीच्या आणि दुर्गम भागात आपल्या हातभट्टीचा व्यवसाय थाटला आहे. ज्याठिकाणी पोलिसांना सहज पोहोचणे अवघड आहे. अडगळीच्या, झाडीत आणि डाेंगरदऱ्यातील हातभट्टी निर्मिती हाेणाऱ्या अड्ड्यांवर आता पाेलिसांनी ड्राेनद्वारे कारवाई कण्याचे नियाेजन केले आहे. या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी थेट आदेश दिले असून, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी गावठी, हातभट्टी निर्मितीचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवलि आहे. या व्यवसायावर, ठिकाणांवर ‘ड्रोन स्ट्राईक’ करून पोलिसांनी हजाराे लिटर हातभट्टी, देशीचा साठा नष्ट केला आहे.

एकाच ठिकाणी उभे राहून केली टेहाळणी...हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ठिकाणी, अड्ड्यांवर एकाच ठिकाणी उभे राहून टेहाळणी करण्यासाठी पाेलिसांनी नवतंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. लातूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात, झाडाझुडपात सुरु असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांची ड्रोनच्या साह्याने व्हिडिओ आणि फुटेज घेत, त्याची खात्री करून हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते अड्डे पाेलिसांच्या पथकाने उध्वस्त कले आहेत.

‘ड्राेन स्ट्राईक’ची कारवाई सुरुच राहणार...

लातूर जिल्ह्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी यापुढेही ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करण्यात येणार असून भविष्यात हा "ड्रोन स्ट्राईक" इतर कारवायांमध्ये ही वापरण्यात येणार आहे. ज्याद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आळवणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने अवैध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर