शैक्षणिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्यामुळे लातूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:49+5:302021-02-06T04:34:49+5:30

चाकूर : लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्यामुळे लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे. हा पॅटर्न देशभर गाजत आहे, असे ...

Latur pattern due to excellent work of educational institutions | शैक्षणिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्यामुळे लातूर पॅटर्न

शैक्षणिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्यामुळे लातूर पॅटर्न

चाकूर : लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्यामुळे लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे. हा पॅटर्न देशभर गाजत आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी येथे केले.

चाकूर पंचायत समितीकडून तालुकास्तरीय आदर्श शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार रमेश कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, नगराध्यक्षा रुपाली पवार, नगरसेवक ॲड. संतोष माने, रवींद्र नीळकंठ, पंचायत समिती सभापती जमुनाबाई बडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, सदस्य वसंतराव डिगोळे, उमा राजमाने, सरिता मठपती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, सभापती रोहिदास वाघमारे, गटविकास अधिकारी आकाश गोकनवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे, माजी तालुकाध्यक्ष मेघराज बाहेती, आटोळाच्या सरपंच रेणुका तोडकरी आदी उपस्थित होते.

यावेळी दरेकर म्हणाले, राज्यातील अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान दिले पाहिजे. फडणवीस सरकारच्या काळात २० टक्के अनुदान दिले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने अनुदान दिले नाही. शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. संपत्तीपेक्षा संततीवर पालकांनी लक्ष द्यावे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला होण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. प्रास्ताविक सज्जनकुमार लोणाळे यांनी केले तर प्रभावती पोतणे, प्रमोद हुडगे यांनी आभार मानले.

कोरोना योद्ध्यांचा सत्कार...

कोरोना काळात चांगले कार्य केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. डी. के. सावंत तसेच बचत गटात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचतगट प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ७९ शिक्षक, शिक्षिकांना गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाठीशी...

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ज्ञानदानातून पिढी उभी राहते. पूर्वी डीपीसीच्या माध्यमातून शिक्षण विभागाला २५ कोटींचा निधी दिला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाला केवळ एक कोटी रुपये देण्यात आले असून, हा निर्णय शिक्षण विभागावर अन्यायकारक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाठीशी आहे.

Web Title: Latur pattern due to excellent work of educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.