राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत लातूरची जोडी ठरली ‘हिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:52+5:302021-04-05T04:17:52+5:30
दोघीही मातब्बर खेळाडू... लातूरच्या या दोघी गुणवान खेळाडू असून, यापूर्वी ज्योतीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ...

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत लातूरची जोडी ठरली ‘हिट’
दोघीही मातब्बर खेळाडू...
लातूरच्या या दोघी गुणवान खेळाडू असून, यापूर्वी ज्योतीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासह शालेय व विद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून लातूरला अनेक पदके मिळवून दिली आहेत. सानिया शेखनेही आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ज्युनिअर व सीनिअर गटात अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकाविली आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या दोघींनीही प्लेईंग-९ मध्ये खेळत राज्याचे व लातूरचे नाव रोशन केले.
रौप्य पदक मिळाल्याचा आनंद...
स्पर्धेत आम्हा दोघींची उत्कृष्ट कामगिरी झाली. अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदक मिळाले. अन्यथा सुवर्ण पदक पटकाविण्याचा मानस होता. पुढच्या वर्षी मात्र नक्की विजेतेपद पटकावू, असे ज्योती पवार व सानिया शेख यांनी सांगितले.
घरच्या घरीच केली प्रॅक्टिस...
गतवर्षी अनेक दिवस मैदान बंद असल्याने या दोघींनी घरच्या घरीच सराव केला. आपली शारीरिक क्षमता कायम राहावी, यासाठी कौशल्यासह फिटनेस कायम ठेवला. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना हे यश मिळाले.