लातूर, उस्मानाबाद जिल्हा गुढ आवाजाने हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:42 IST2019-01-07T12:41:21+5:302019-01-07T12:42:13+5:30
या आवाजामुळे घरावरील पत्रे, खिडक्यांची तावदानेही हादरली.

लातूर, उस्मानाबाद जिल्हा गुढ आवाजाने हादरला
लातूर / उस्मानाबाद : लातूर जिल्ह्यातील किल्लारी, नादुर्गा परिसरासह उस्मानाबाद शहरात सोमवारी सकाळी ११.५५ वाजता अचानक मोठा गुढ आवाज आल्याने खळबळ उडाली. या आवाजामुळे घरावरील पत्रे, खिडक्यांची तावदानेही हादरली.
औसा तालुक्यातील किल्लारी आणि नादुर्गा परिसराला सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. तर उस्मानाबाद शहर गुढ आवाजाने हादरले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत लातूरच्या भूकंपमापक केंद्रात कुठलीही नोंद नाही,असे ए. जी. बोरडेकर यांनी सांगितले.