लातुरात आता फळ-झाडांचाही ऑक्सिजन पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:16+5:302021-06-06T04:15:16+5:30
शहरातील नवीन बसस्थानक, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे. यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, ...

लातुरात आता फळ-झाडांचाही ऑक्सिजन पार्क
शहरातील नवीन बसस्थानक, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे. यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त मंजूषा गुरमे, अभिजित देशमुख, आय.एम.ए.च्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किणीकर, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके, क्षेत्र अधिकारी नामदेव द्वारसेवाड, क्षेत्र अधिकारी रवींद्र क्षीरसागर, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अभय कदम, डॉ. मोहिनी गानू, विशालजी राठी, डॉ. रामेश्वरी अलाहाबादे, डॉ. सुवर्णा गोरे, डॉ. राजश्री सावंत, डॉ. चारू उदगीरकर, डॉ. होळीकर, सोनू डगवाले यांची उपस्थिती होती. पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकार यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, असे मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आंबा, चिंच, पेरू, रामफळ, जांभूळ, आवळा, लिंबू, सीताफळ आदी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, सुलेखा कारेपूरकर, प्रमोद निपाणीकर, मनमोहन डागा, गंगाधर पवार, विकास कातपुरे, कल्पना फरकांडे, सार्थक शिंदे, कल्पना कुलकर्णी, मोईज मिर्झा, मीनाक्षी बोंडगे, वैशाली पाटील, प्रसाद शिंदे, प्रसाद श्रीमंगलगे, आशा अयाचित, प्रिया नाईक, युगा कनामे, कृष्णा वंजारे, समृद्धी फड, स्वामी नागेश, खाजा पठाण, विक्रांत भूमकर, डॉ. अमृत पत्की, अरविंद फड, विजयकुमार कठारे, महेश गेलडा, दयाराम सुडे, नितीन पांचाळ, बोडके पांडुरंग, शेख फारूक, तांबोळी असिफ, आदित्य फंड, वैजनाथ वानखेडे, साहिल जाधव, रोहित पत्की, नागसेन कांबळे, कुंदन सरवदे, मुकेश लाटे, सूरज साखरे, अभिषेक लड्डा, सिया लड्डा, राजलक्ष्मी लड्डा, आकाश चिल्लरगे, बळीराम दगडे, राहुल माने, शैलेश सूर्यवंशी, सादिक कमलापुरे, नितीन कामखेडकर, प्रसाद जाधव, सोमनाथ चिल्लरगे आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.