लातूर- नराधम पित्याचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: June 24, 2014 19:08 IST2014-06-24T18:53:42+5:302014-06-24T19:08:21+5:30

जीवे मारण्याची धमकी देत एका नराधम पित्याने पोटच्या पोरीवर चार वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे

Latur - Naradham's father's daughter raped | लातूर- नराधम पित्याचा मुलीवर बलात्कार

लातूर- नराधम पित्याचा मुलीवर बलात्कार

ऑनलाइन टीम

लातूर, दि. २४ - जीवे मारण्याची धमकी देत एका नराधम पित्याने पोटच्या पोरीवर चार वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. लातूर एमआयडीसी येथे राहणा-या सुधाकर दूधभाटे (वय ६०) हा नराधम गेल्या चार वर्षांपासून आपल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करत होता. या प्रकाराबद्दल कोणलाही काहीही सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत त्याचे हे नीच कृत्य सुरू होते. अखेर या अत्याचाराला विटलेल्या मुलीने धैर्य दाखव पोलिसांत वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवली. लातूर पोलिसांनी त्याच्यावर ३७६ कलम व बाल लैंगिक अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला व काल त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला उद्यापर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 

Web Title: Latur - Naradham's father's daughter raped