शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

लातूरच्या बाजारपेठेत उडीद, सोयाबीनला मिळाला उच्चांकी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:50 IST

बाजारगप्पा : दोन महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच उडिदाचा दर ६ हजारांपर्यंत पोहोचला़, तर सोयाबीनला कमाल दर ३ हजार ४८१ रुपये असा मिळाला़

- हरी मोकाशे (लातूर)

यंदाचा दीपावली पाडवा सण हा शेतकऱ्यांसाठी उच्चांकी भाव देणारा ठरला आहे़ दोन महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच उडिदाचा दर ६ हजारांपर्यंत पोहोचला़, तर सोयाबीनला कमाल दर ३ हजार ४८१ रुपये असा मिळाला़ विशेष म्हणजे, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्यादिवशी ३४ हजार १४६ क्विं़ शेतमालाची आवक झाली होती़

राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गणल्या जाणाऱ्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली सणानिमित्ताने शेतीमालाची आवक वाढली होती़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली़ निघालेल्या उत्पादनातून सण आनंदात साजरा करता यावा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री करण्यास सुरुवात केली होती़ उत्पादनात घट झाल्याने सुरुवातीपासूनच सोयाबीनला ३ हजार रुपयांच्या पुढे दर मिळत होता.

पाडव्यादिवशी २६ हजार ९८५ क्विं़ची आवक होऊन सर्वसाधारण दर ३ हजार ४३१ रुपये मिळाला़ आधारभूत किमतीच्या तुलनेत हा दर अधिक ठरला आहे़ आगामी काळात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता  आहे़ त्यामुळे काही शेतकरी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेत आहेत़पाडव्यादिवशी उडिदाची आवक २ हजार ४१ क्विं़ होऊन सर्वसाधारण दर ५५५० रुपये मिळाला़ यंदाच्या खरीप हंगामातील उडिदाला प्रथमच सर्वाधिक भाव मिळाला आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांची प्रति क्विं़ मागे १००० ते १२०० रुपयांची लूट होत होती़ दरम्यान, बाजरीस सर्वसाधारण दर २२५०, गहू- २०००, हायब्रीड ज्वारी- १३००, रबी ज्वारी- २५००, पिवळी ज्वारी- ३६००, मका- १३००, हरभरा- ५०००, साळी- १२००, मूग- ५०००, तूर- ४०५०, एरंडी- ३५११, करडई- ३५००, तीळ- ११ हजार रुपये, गुळास प्रति क्विं़ ३०६१ रुपये असा दर मिळाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र