शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: May 20, 2025 00:24 IST

उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यूने गाठले. महिलेबरोबर मुलगा आणि जावयानेही गमावला जीव.

- राजकुमार जोंधळे, चाकूर (जि. लातूर) दुचाकीवर निघालेल्या तिघांना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने जोराची धडक दिली. यात आई, मुलगा व जावई यांचा मृत्यू झाल्याची घटना घरणी (ता. चाकूर) येथील पुलानजीक सोमवारी (१९ मे) दुपारी घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मृतांमध्ये विठ्ठल शिंदे (३४), आई यशोदाबाई शिंदे (६५) आणि जावई लालासाहेब पवार (३८) यांचा समावेश आहे.

घरणी येथील विठ्ठल शिंदे, त्यांची आई यशोदाबाई शिंदे आणि यशोदाबाई यांचे जावई लालासाहेब पवार (रा. तळेगाव घाट, ता. अंबाजोगाई) हे तिघे दुचाकीवरून (एमएच २४ बीक्यू ६८३७) घरणी येथून यशोदाबाईंना दवाखान्यात उपचारासाठी चाकूरला नेत होते. 

वाचा >>ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?

दरम्यान, लातूरहून चाकूरकडे येणाऱ्या दुचाकीने (२६ बीएन ७०१२) पाठीमागून विठ्ठल शिंदे यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली. यात लालासाहेब पवार, यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे हे गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर संजय पांचाळ (रा. सांगवी) हाही गंभीर जखमी झाला. 

जखमींना चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. लालासाहेब पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे यांचा लातुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानेश्वर पांचाळ यांच्यावर लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश मरपल्ले, आत्माराम केंद्रे, बसलिंग चिद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी...

चाकूर ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ती पोलिसांनी मोकळी केली. याबाबत अद्याप तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही. 

यशोदाबाई शिंदे यांच्या पश्चात पती, मुलगा, चार मुली तर विठ्ठल शिंदे याचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि लालासाहेब पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातLatur policeलातूर पोलीसLatur civil hospitalजिल्हा रुग्णालय लातूरDeathमृत्यू