युद्धाच्या ठिणग्या आता थेट विद्यार्थ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. न्यू दुबई येथे रोबोटिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या लातूरच्या नेहा मनोज मिसार हिच्या हॉस्टेल रूमच्या अगदी जवळून मिसाईल गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे लातूरमधील सरस्वती कॉलनी भागात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांची झोप उडाली असून, जिल्हा प्रशासनाने आता याप्रकरणी हालचाली सुरू केल्या आहेत.
लातूरच्या सरस्वती कॉलनीतील सोनाली मिसार यांची कन्या नेहा ही उच्च शिक्षणासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये न्यू दुबईला गेली होती. ती तिथे रोबोटिक इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. सध्या त्या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहा ज्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे, तिथल्या पाचव्या मजल्यावरील तिच्या रूमच्या अगदी जवळून एक मिसाईल गेल्याची माहिती तिने आई-बाबांना दिल्याने चिंता वाढली आहे. नेहाने फोनवरून ही माहिती आपल्या आई-वडिलांना दिली.
नेहा आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी सुरक्षित आहेत. पण डोळ्यातदेखत मिसाईल रूमच्या बाजूने गेल्याची भीषणता तिने मांडली. ही भीषणता ऐकून आई सोनाली मिसार प्रचंड काळजीत आहे. नेहा सध्या आईच्या सतत संपर्कात असली, तरी तिथली अशांतता पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
प्रशासनाकडून मदतीचे आवाहन!
मिळालेल्या माहितीनुसार, मिसाईलच्या घटनेनंतर नेहा आणि तिच्यासोबत असलेल्या इतर विद्यार्थिनींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच मिसार कुटुंबाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची कल्पना दिली आहे.
मुलीचा फोन आल्यापासून आमचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने तिला आणि तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुरक्षित मायदेशी आणावे, हीच आमची विनंती आहे. - सोनाली मिसार (नेहाची आई
Web Summary : A Latur student in New Dubai experienced a terrifying incident as a missile flew close to her dorm room. Parents are deeply concerned, urging authorities to ensure the safety and repatriation of Indian students amid escalating tensions.
Web Summary : न्यू दुबई में लातूर की एक छात्रा के छात्रावास के पास मिसाइल गिरने से दहशत फैल गई। बढ़ते तनाव के बीच माता-पिता चिंतित हैं, अधिकारियों से भारतीय छात्रों की सुरक्षा और वापसी सुनिश्चित करने का आग्रह कर रहे हैं।