शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Latur: धक्कादायक! सारोळा वनात वनविभागाकडूनच वृक्षांची कत्तल; ग्रामस्थांनी ट्रक पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:56 IST

औसा तालुक्यातील सारोळा वनातील प्रकार; वनविभागाची चोरी ग्रामस्थांनी पकडली,अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

- महेबूब बक्षीऔसा (लातूर): पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कर्तव्य असलेल्या वनविभागानेच चक्क उभ्या झाडांची कत्तल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक प्रकार सारोळा (ता. औसा) येथे उघडकीस आला आहे. मयत हरणांना जाळण्यासाठी आणि 'घनवन' लागवडीसाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली शेकडो किलो वजनाची झाडे तोडली जात असताना ग्रामस्थांनी लाकडांनी भरलेला टेम्पो पकडला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काय आहे नेमका प्रकार? सारोळा गावाशेजारी ३२ हेक्टर वनक्षेत्र आहे. येथील ग्रामस्थांनी तलावाचे पाणी वापरून ही झाडे जगवली आहेत. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून वनविभागाच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू होती. सोमवारी लाकडांनी भरलेला टेम्पो जात असताना सरपंच समाधान पाटील आणि ग्रामस्थांनी तो अडवला. चौकशी केली असता, मयत हरणांना जाळण्यासाठी जळण म्हणून ही लाकडे नेत असल्याचे अजब उत्तर वनविभागाच्या वतीने देण्यात आले.

वनविभागाचे परस्परविरोधी दावे या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोते यांनी सांगितले की, 'घनवन' संकल्पनेसाठी अतिरिक्त झाडांची विरळणी करण्यात येत आहे. तर वनरक्षक महादेव मुंडे यांच्या मते, हरणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने त्यांना जाळण्यासाठी जळण म्हणून ही झाडे तोडली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे संशय बळावला असून, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरू असलेल्या या 'कत्तली'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रक्षकच भक्षक बनल्याची भावना "शासन वने लावण्यासाठी कोटींचा निधी खर्च करते आणि येथे अधिकारीच उभी झाडे तोडत आहेत. जर रक्षकच भक्षक बनले तर वनांचे संरक्षण कोण करणार?" असा सवाल सरपंच समाधान पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी राहुल साळुंके, शिवपुत्र स्वामी, विलास पाटील यांच्यासह सारोळा व एरंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Forest Dept. Cuts Trees; Villagers Catch Truck in Sarola!

Web Summary : Forest department illegally felled trees in Sarola forest, Latur, sparking outrage. Villagers caught a truck loaded with wood. Conflicting reasons were given for the tree cutting, raising suspicion and demands for action.
टॅग्स :forest departmentवनविभागlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी