शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्याचे ३८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर, पावणेतीन महिन्यांपासून शेतक-यांची सुरू होती धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:40 IST

गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.

 - हरी मोकाशे लातूर  - गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीस पावसाचा गुंगारा व त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. दरम्यान, पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होत पिकांचा विमा हप्ता भरला होता. लातूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांत मे अखेरीसपर्यंत पीकविमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झाली होती. परंतु, लातूर जिल्ह्यात मात्र पीकविम्याचा घोळ सुरू झाला होता. सुरुवातीस अडीचशे कोटी रुपये पीकविमा मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वाटपास सुरुवात झाल्यानंतर १०० कोटींची तफावत निर्माण होऊन १५० कोटींचा पीकविमा वाटप झाला होता. पहिल्या टप्प्यात बहुतांश शेतकºयांनी पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने या शेतकºयांची धावाधाव सुरू होती. दरम्यान, पीकविमा कंपनीने दुसरा टप्पा जाहीर करीत ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. दोन टप्पे झाले असतानाही जिल्ह्यातील जवळपास ५० गावे पीकविम्यापासून वंचितच होती. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे तक्रार करुन संताप व्यक्त केला होता. पीकविमा मिळावा म्हणून शेतकºयांची धावाधावही सुरू होती. दरम्यान, या संदर्भात वारंवार ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत तसेच लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या पाठपुराव्यामुळे तिसºया टप्प्यात लातूर जिल्ह्यास ३८ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. पीकविमा लाभार्थी शेतकºयांची यादी व रक्कम संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. २ लाख १० हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ... तिसºया टप्प्यात ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ २ लाख १० हजार शेतकºयांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ लाख ८ हजार ४७८ शेतकºयांसाठी १३४ कोटी तर दुस-या टप्प्यात २ लाख ७४ हजार ९०० शेतकºयांसाठी ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध झाले होते. जिल्ह्यातीलएकूण ७ लाख ९३ हजार ३७८ शेतक-यांना २३० कोटी ३५ लाख रुपये मिळत आहेत. वंचित ५० गावांचा समावेश... तिसºया टप्प्यात पीकविम्यापासून वंचित असलेल्या जवळपास ५० गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठलाही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही. विमा कंपनीने लाभार्थी शेतक-यांची यादी व पैसे बँकांकडे वर्ग केले आहेत, अशी माहिती नॅशनल इंशुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी दिली. जिल्हा बँकेकडे ४ कोटी वर्ग... लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीकविम्यापोटी ४ कोटी ३३ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू आहे. लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एच.जे. जाधव यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर