कोरोना लसीकरणात लातूर जिल्हा १६ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:43+5:302021-02-05T06:25:43+5:30
लातूर : जिल्ह्यात आता कोरोना लसीकरणाला वेग आला असून, १७ हजार ३९४ जणांपैकी ६ हजार २६० जणांना लसीकरण करण्यात ...

कोरोना लसीकरणात लातूर जिल्हा १६ व्या क्रमांकावर
लातूर : जिल्ह्यात आता कोरोना लसीकरणाला वेग आला असून, १७ हजार ३९४ जणांपैकी ६ हजार २६० जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणात लातूर जिल्हा १६ व्या क्रमांकावर आहे. अधिकृत रँक काढली नसली तरी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून ही क्रमवारी आहे.
जिल्ह्यात प्रारंभी सहा केंद्र लसीकरणासाठी कार्यान्वित केले होते. आता त्यात सातने वाढ केली असून, १३ केंद्रांवर आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार लस दिली जात आहे. प्रत्येक केंद्राला उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टानुसार गेल्या तीन दिवसापासून लसीकरणाच्या कामाला वेग आला आहे.
दुसरा डोजही प्राप्त
पहिल्या टप्प्यासाठी १७ हजार ३९४ जणांची नोंद झाली आहे. त्यासाठी २० हजार ९८० डोज प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोज शासनाकडून प्राप्त झाला आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोज संबंधित कर्मचाऱ्यांना दिला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी सांगितले.