शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेच्या वादातून मुलाने आई-वडलांना नारळपाण्यातून पाजले विष, वडलांचा मृत्यू, आई अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 00:35 IST

लातूर शहरातील मोरे नगर परिसरात मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला.

लातूर  - शहरातील मोरे नगर परिसरात मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आईची प्रकृती अत्यवस्थ आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

साधुराम कोटंबे (७२) हे पत्नी गयाबाई यांच्यासह मोरेनगर येथील घराच्या अंगणात १३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बसले होते. यावेळी मुलगा ज्ञानदीप कोटंबे (२९) याने आई-वडिलांना नारळपाणी पिण्यास दिले. दरम्यान, नारळपाणी कडवट लागत असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. मात्र मुलाने नारळपाणी कडवटच असते, असे उत्तर दिले. वडील साधुराम कोटंबे यांनी नारळपाणी पूर्ण पिले आणि आई गयाबाई कोटंबे (६५) यांनी दोन घोट नारळपाणी घेऊन ते तसेच ठेवून दिले. काही वेळाने अत्यवस्थ वाटत असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी उपचारासाठी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान वृद्ध वडील साधुराम कोटंबे यांचा १४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत उपचार सुरू असलेल्या गयाबार्इंच्या जबाबावरून मुलगा ज्ञानदीप कोटंबे याच्याविरोधात शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं १४८/२०१८ कलम ३०२, ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाटणीतून केले कृत्यज्ञानदीपने आई-वडिलांकडे प्लॉट, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीची मागणी केली होती. यासंदर्भात त्याने आई-वडिलांकडे तगादा लावला होता. यातूनच त्याने जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला.

टॅग्स :crimeगुन्हेnewsबातम्या