शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने सोडले घर; देवणी पोलिसांनी अक्कलकोटमधून २ तासांत शोधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:28 IST

देवणी ते अक्कलकोट... असा लागला शोध

देवणी बु. (जि. लातूर) : परीक्षेतील एखादा कठीण गेलेला बारावीचा पेपर आणि मनावर आलेले प्रचंड दडपण... एका क्षणी या तणावाने इतके टोक गाठले की, एका अल्पवयीन मुलीने स्वतःचे घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची भीती मनात दाटली होती. मात्र, देवणी (बु.) पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि ‘खाकी’मधील माणुसकीमुळे अवघ्या दोन तासांमध्ये या मुलीचा शोध लागला. तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यानंतरच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

पाेलिसांनी सांगितले की, देवणी पोलिस ठाण्यात गुरुवार, दि. ५ मार्च राेजी एक हतबल बाप दाखल झाला. त्याने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ‘कुणीतरी माझ्या लेकीला पळवून नेले,’ असा संशय व्यक्त करीत असताना त्यांच्या डोळ्यांतील पाणी पोलिसांना बरंच काही सांगून जात होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

अक्कलकाेट येथे श्री स्वामीसमर्थांच्या दरबारात लागला शोध...सहायक पोलिस निरीक्षक भीमराव गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू केला. तपासाचे धागेदोरे थेट सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटपर्यंत पोहोचले. ती मुलगी स्वामी समर्थांच्या दारी पाेहोचली हाेती. देवणी पोलिसांनी तातडीने अक्कलकोट पोलिसांशी संपर्क साधला अन् अवघ्या दोन तासांमध्ये तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. तपास पोहेकाॅ. आर.जी. लामतुरे करीत आहेत.

यशापेक्षा आयुष्य खूप मोठे आहे;पालकांनाे, मुलांना विश्वासात घ्या !जेव्हा मुलीची विचारपूस झाली, तेव्हा समोर आलेले सत्य अस्वस्थ करणारे होते. बोर्डाचा पेपर कठीण गेल्यामुळे निर्माण झालेला प्रचंड मानसिक तणाव आणि भीतीपोटी तिने घर सोडले होते. ‘आई-वडील काय म्हणतील?’ अथवा ‘लोकांना काय तोंड दाखवू?’ या विचाराने ती हतबल झाली होती. आज मुलगी आपल्या घरात सुखरूप आहे. ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. गुणांच्या शर्यतीत आपण आपल्या मुलांच्या मनाचा कानोसा घ्यायला विसरत तर नाही ना? पेपर कठीण गेला तरी आयुष्य संपत नाही, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आज प्रत्येक पालकाची आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Distressed by tough exam, girl flees; police find her quickly.

Web Summary : Upset after a difficult 12th-grade exam, a girl left home, fearing failure. Police swiftly located her in Akkalkot within two hours. She was found safe near Swami Samarth's temple. The incident highlights parental pressure, urging families to support children beyond academic results.
टॅग्स :laturलातूरStudentविद्यार्थी