शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची भेट ठरली अखेरची! सख्ख्या भावांच्या दुचाकीस अपघात; एकाचा मृत्यू, दूसरा जखमी

By संदीप शिंदे | Updated: April 10, 2025 17:33 IST

औसा टी पॉईंट येथे वीस दिवसांत अपघातातील दुसरा बळी; अज्ञात वाहनाची धडकेत दुचाकीवरील भावाचा अंत

औसा (जि. लातूर) : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एक भाऊ जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास औसा टी पॉईंट येथे घडली. बालाजी राम मोरे (वय ५५ रा. याकतपूर ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील याकतपूर येथील शेतकरी बालाजी राम मोरे व नेताजी राम मोरे हे दोघे सख्खे भाऊ बहिणीला भेटून दुचाकीवरून गावाकडे जात असताना औसा टी पॉईंटजवळ आले असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात बालाजी राम मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नेताजी राम मोरे हे जखमी झाले आहेत. जखमी नेताजी मोरे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. मागील वीस दिवसांतील टी पॉईंट चौकातील हा दुसरा अपघात असून यात दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बहिणीची भेट ठरली अखेरची...अपघातातील दोघे सख्खे भाऊ सेलू येथील आपल्या बहिणीला भेटून गावाकडे परतत होते. चार किलोमीटर अंतरावर गाव आले असता हा दुर्दैवी अपघात घडला. मयत बालाजी यांना दोन मुले व एक मुलगी असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता.

उड्डाणपुल करण्याची मागणी...नागपूर - रत्नागिरी (३६१) हा राष्ट्रीय महामार्ग औसा शहरातून जात असल्याने सतत मालवाहतुकीच्या व अवजड वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावर अपघात होत असल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत असून, याचा जाब लोकप्रतिनिधींना विचारला जाईल. टी पॉईंट चौकात उड्डाणपूल लवकर बांधावा अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख शिवकुमार नागराळे यांनी केली.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू