शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही नसला तरी परीक्षा केंद्रावर 'झूम'ची नजर; लातूर बोर्डाचा कॉपी बहाद्दरांना झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:41 IST

कॉपी बहाद्दरा सावधान! सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर 'झूम लिंक'चा वॉच; लातूर विभागीय मंडळाची कॉपीमुक्तीसाठी मोठी पावले

लातूर :दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग हाती घेतला आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तिथे आता 'झूम लिंक' द्वारे थेट लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या शाळेत कॅमेरे नाहीत, तिथे पेपर रनरच तीन तास कॅमेऱ्याद्वारे वॉच ठेवत असल्याने कॉपी बहाद्दरांना आळा बसला आहे.

लातूर विभागीय मंडळात दहावीचे जवळपास १ लाख १० हजार ९८३ विद्यार्थी ४१९ परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत. यातील जवळपास ७६ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले नव्हते. २० फेब्रुवारीनंतरही नांदेडमधील अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार बहुतांश शाळांनी सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र, अद्यापही काही केंद्रांवर ही सुविधा नाही.

दहावीच्या परीक्षा केंद्रांची स्थितीजिल्हा - एकूण केंद्र - सीसीटीव्ही नसलेली केंद्रेलातूर - १५२ - १२नांदेड - १७८ - ४७धाराशिव - ८९ - १७

उदगीरमध्ये १ कॉपी प्रकरण...शुक्रवारी दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. शिक्षण विभागाने कॉपीमुक्तीसाठी कडक पावले उचलली असली तरी काही ठिकाणी कॉपीचे प्रयत्न सुरू आहेत. उदगीर तालुक्यातील राजर्षी शाहू विद्यालयात एक कॉपी प्रकरण उघडकीस आले. तसेच नांदेड जिल्ह्यातही दोन ठिकाणी कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथके आणि झूम लिंकच्या माध्यमातून ही पाळत ठेवली जात आहे.

संपूर्ण प्रक्रियेवर देखरेखज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा केंद्रांवर बाह्य पर्यवेक्षक यंत्रणेसह झूम लिंकद्वारे लक्ष ठेवले जात आहे. ही लिंक आमच्या वॉर रूमशी कनेक्ट असून तिथून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख केली जाते.- अनुपमा भंडारी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, लातूर

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Board uses Zoom to monitor exam centers without CCTV.

Web Summary : Latur board innovatively uses Zoom in centers lacking CCTV to curb cheating during tenth-grade exams. Paper runners monitor via Zoom, deterring malpractice. Over 76 centers previously lacked CCTV; now, Zoom links provide surveillance, overseen from a central war room.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रlaturलातूरssc examदहावी