शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठले; कार ट्रकखाली घुसली, महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:25 IST

जळकोट हादरले! भरधाव कारचा उभ्या ट्रकला भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

जळकोट (जि. लातूर) : एकीकडे नातेवाईकाच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे काळाने घातलेला घाला, अशा हृदयद्रावक घटनेने जळकोट शहर हादरले आहे. अंत्यविधीसाठी नांदेड येथून कर्नाटककडे जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जळकोट शहरातील महात्मा फुले चौकामध्ये घडला.

पाेलिसांनी सांगितले, नांदेड येथील सूर्यवंशी कुटुंबीय आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कर्नाटक राज्यातील डोणगाव (ता. कमलनगर जि. बीदर) येथे कारने (एम.एच. १२ एफ ०२९९) निघाले होते. ही कार जळकोट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात उदगीरच्या दिशेने जात होती. याच दरम्यान, महामार्गावरील महात्मा फुले चौकाजवळ एका ट्रकचे (एम.एच. २६ ए.डी. ०३३३) टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उभ्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा चक्काचूर होऊन ती ट्रकच्या खाली घुसली.

अपघातात जखमी महिलेचा जागीच मृत्यूअपघातात ध्रुपताबाई सूर्यवंशी (रा. नांदेड) यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर प्रवासी बस्वराज सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी आणि वर्षा म्हेत्रे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना कारबाहेर काढले.

प्रकृती चिंताजनक; लातूरला हलवलेजखमींना तातडीने उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना लातूर येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणीजळकोट शहरातील या चौकात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. अपघाताच्या भीषणतेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. तपास पोलिस निरीक्षक माचेवाड यांच्यासह सहकारी तपास करत असून, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Grief Turns to Tragedy: Car Crash Kills Woman En Route to Funeral

Web Summary : A family traveling to a relative's funeral in Karnataka met with tragedy near Jalkot. Their car crashed into a stationary truck, killing a woman and seriously injuring three others. The accident occurred due to overspeeding and a burst tire on the truck. Locals demand speed bumps.
टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर