ट्रकच्या केबिनमधून चालकाच्या खिशातील रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:09+5:302021-02-17T04:25:09+5:30

भांडण सोडण्याच्या कारणावरून मारहाण लातूर : फिर्यादीच्या भावास मानखेड पाटीवर असलेल्या आम्रपाली ढाबा येथे सोड म्हणून भांडण झाले. सदर ...

Lampas the cash in the driver's pocket from the cabin of the truck | ट्रकच्या केबिनमधून चालकाच्या खिशातील रोख रक्कम लंपास

ट्रकच्या केबिनमधून चालकाच्या खिशातील रोख रक्कम लंपास

भांडण सोडण्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : फिर्यादीच्या भावास मानखेड पाटीवर असलेल्या आम्रपाली ढाबा येथे सोड म्हणून भांडण झाले. सदर भांडण सोडविण्यास गेल्याने फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारून जखमी केल्याची घटना मानखेड येथे घडली. याबाबत ज्ञानोबा पंढरीनाथ भिकाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव व्यंकटी सांगोले (रा. मानखेड, ता. अहमदपूर) याच्याविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गंजगोलाई येथून दुचाकीची चोरी

लातूर : गंजगोलाई येथे पार्किंग केलेल्या एमएच ०२ बीए ८२७८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत शेख साबेर अयुब (३०, रा. हज्जू नगर, कातपूर रोड लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : आमच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार का केलीस म्हणून तसेच हे घर तुझ्या एकट्याचे नाही, आठ जणांचे आहे अशी भांडणाची कुरापत काढून लाथा-बुक्क्यांनी तसेच हातातील वीट डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना शास्त्रीनगर येथे घडली. याबाबत गुलाम गौसा मुनाफ शेख यांच्या फिर्यादीवरून कौसर मुनाफ शेख व अन्य दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पैसे कमी दिल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : कन्हेरी चौक येथे देशी दारूच्या दुकान चालकाकडे तुम्ही मला परत दिलेल्या पैशांत शंभर रुपये कमी आहेत, अशी विचारणा केली असता यातील आरोपितांनी संगनमताने शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉडने डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पायाखाली मारून फ्रॅक्चर केले, यावरून सत्यवान नरेंद्रसिंग ठाकूर (रा. क्वाईल नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सुभाष राठोड व अन्य दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

चेंडू आणून दे म्हणून मारहाण

लातूर : घराकडे जात असताना फिर्यादीला आरोपींनी चेंडू आणून दे म्हणून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना उदगीर येथे घडली. याबाबत शेख फैय्याज निजाम (रा. राज महंमद दर्गा, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवन मोतेवाड व अन्य दोघांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Lampas the cash in the driver's pocket from the cabin of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.