सबळ पुराव्यांचा अभाव; ८५ टक्के आराेपी सुटतात निर्दाेष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:21+5:302021-08-28T04:24:21+5:30
लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १९१ खटल्यांची सुनावणी झाली. यामध्ये भारतीय दंड ...

सबळ पुराव्यांचा अभाव; ८५ टक्के आराेपी सुटतात निर्दाेष !
लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १९१ खटल्यांची सुनावणी झाली. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३५३, ४९८, ३०६, ३०७, ३९४, ३५४, ३०४ अन्वये दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये दाेन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. अंतिम सुनावणीनंतर खटल्यांचा निकाल समाेर आला आहे. यामध्ये वर्षभरात १९१ खटल्यांपैकी केवळ ३० प्रकरणातील आराेपींना शिक्षा झाली आहे. तर एकूण खटल्यापैकी तब्बल ८५ टक्के खटल्यातील आराेपी आराेप सिद्ध झाला नाही, सबळ पुराव्याअभावी निर्दाेष सुटले आहेत.
गुन्हा सिद्धीचे प्रमाण घटले...
वर्षभरात १९१ खटल्यांचा निकाला समाेर आला आहे. यातील ८५ टक्के खटल्यातील आराेपीविराेधात गुन्हा सिद्ध झाला नाही. शेवटच्या टप्प्यात साक्षीदार फितूर हाेणे, साक्ष फिरवणे, घनास्थळवरील पुराव्यांचा अभावा, इतर पुरावे न्यायालयात सादर करताना न येणे आणि दाेषाराेपपत्रात असलेल्या त्रुटीमुळे गुन्हा सिद्धीचे प्रमाण घटत असल्याचे समाेर आले आहे. पंचनामा, अधिकाऱ्यांचा, फिर्यादीचा जबाबत, वैद्यकीय अहवाल आणि दाेषाराेपपत्रात करण्यात आलेल्या नाेंदी गुन्हे सिद्धीसाठी महत्वाच्या ठरतात.
अपयशाचे खापर साक्षीदारांवर...
न्यायालयात खटला अंतिम सुनावणीला येताे, त्यावेळी पाेलीस प्रशासनाकडून दाखल करण्यात येणाऱ्या पुराव्यात साक्षीदार महत्वाची भूमिका बजावताे. बहुतांश प्रकरणात साक्षीदार उलटल्याने आराेपी निर्दाेष सुटले, अशी माहिती समाेर येते. मात्र, अनेक प्रकरणात साक्षीदाराबराेबर इतर पुरावेही महत्वाचे ठरतात. गुन्हे सिद्धीसाठी लागणाऱ्या पुराव्यांची, कागदपत्रांची पूर्तता केल्यास आराेपींना शिक्षा घडविता येते.
पंच, साक्षीदार आणि फिर्यादी फितूर हाेण्याचे प्रमाण अधिक...
अनेक खटल्यामध्ये अंतिम सुनावणीदरम्यान पंच, साक्षीदार आणि फिर्यादी स्वत: फितूर झाल्याचे समाेर आले आहे. यातून न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्याने आराेपी निर्दाेष सुटतात. त्याचबराेबर सबळ पुरावे सादर करण्यात कमी पडणे हेही प्रमुख कारण आहे. मात्र, पंच, साक्षीदार आणि फिर्यादीचा जबाबही तेवढाच महत्वाचा असताे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर