उत्कृष्ट तपास करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:32+5:302021-09-11T04:21:32+5:30

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची प्रमुख ...

Lack of excellent investigative staff | उत्कृष्ट तपास करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव

उत्कृष्ट तपास करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

यावेळी सपोनि राहुल बहुरे हे औसा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट केला. चाेरीला गेलेला मुद्देमाल १०० टक्के हस्तगत केला हाेता. या गुन्ह्याची उकल करताना त्यांनी अतिशय बारकाईने भौतिक आणि तांत्रिक माहितीचा उत्कृष्टपणे वापर करत गुन्हा उघडकीस आणला हाेता. या कार्याबद्दल राहुल बहुरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर करण्यात आले होते. त्यानिमित्त सपोनि बहुरे आणि त्यांना तपासासाठी मदत करणारे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, राजेश कंचे, विश्वंभर तुरे यांना पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Lack of excellent investigative staff