जावळीत १५० जणांना कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:45+5:302021-05-31T04:15:45+5:30
औसा तालुक्यातील जावळी येथील नागरिकांना लसीसाठी ६ किमी दूर असलेल्या लामजना येथे यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण ...

जावळीत १५० जणांना कोविड लस
औसा तालुक्यातील जावळी येथील नागरिकांना लसीसाठी ६ किमी दूर असलेल्या लामजना येथे यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत होती. गावातच लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत होती. अखेर शनिवारी लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. आर.आर. शेख यांच्या शिवसेनेचे तानाजी सुरवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पेंढारकर, शिवसेनेचे तानाजी सुरवसे, सरपंच यशवंत बंडे, माजी सभापती दिनकर मुगळे, माजी उपसरपंच रामेश्वर मुळे, प्रकाश मुळे, नीळकंठ हेंबाडे, महादेव खिचडे, बकंट हेंबाडे, व्ही.बी. कुरील, ए.एच. पवार, सतीश येळनुरे, उषा पाटील, समा शेख, सरिता हेंबाडे, मंजुश्वरी मुगळे, शामल यादव आदी उपस्थित होते.