साडेचार हजार नागरिकांनी घेतली कोविड प्रतिबंधात्मक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:34+5:302021-04-11T04:19:34+5:30
सुरुवातीस शिरूर अनंतपाळ आणि साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांची ...

साडेचार हजार नागरिकांनी घेतली कोविड प्रतिबंधात्मक लस
सुरुवातीस शिरूर अनंतपाळ आणि साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी. त्यांना नजीकच्या उपकेंद्रावर लस उपलब्ध व्हावी म्हणून तालुक्यातील विविध गावांतील ७ उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान झाली आहे. शुक्रवार्पंयत ४ हजार ५४८ नागरिकांनी कोविड लस घेतली आहे.
लसीकरण मोहीम गतिमान व प्रभावीपणे राबविली जावी म्हणून, लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तालुक्यातील ४५ वर्षांखालील १५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरुर अनंतपाळात सर्वाधिक लसीकरण...
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सात उपकेंद्रात लसीकरण सुरू आहे. शिरूर अनंतपाळ येथे ३ हजार ३१, साकोळ- ७७४, शिवपूर उपकेंद्रात ५९, तळेगाव- ११३, हालकी- १६२, उजेड- ४४, हिप्पळगाव- १५०, धामणगाव- ५६ तर येरोळ येथे एका दिवसात १५९ अशा एकूण ४ हजार ५४८ नागरिकांनी लस घेतली आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच लसीकरण करून घेतलेल्यांनीही शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी केले आहे.