जळकोटातील कोविड केअर सेंटर फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:29+5:302021-04-09T04:20:29+5:30
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७६४ वर पोहोचली आहे. ...

जळकोटातील कोविड केअर सेंटर फुल्ल
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७६४ वर पोहोचली आहे. त्यातील ५६७ जण उपचारानंतर ठणठणीत झाल्याने घरी गेले आहेत. काेरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण १७३ आहेत. त्यातील १०६ जण गृहविलगीकरणात आहेत. ३० जणांना लातूर, उदगीर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये २६ जणांवर उपचार असून, जळकोट शहरातील बाधित रुग्णांची संख्या ३६ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत असले तरी तिथे व्हेंटिलेटरची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे.
नवीन कोविड केअर सेंटर सुरू होईल...
तालुक्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७३ आहे. येथील कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहे. त्यामुळे नवीन कोविड केअर सेंटर औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.