केळगावच्या सरपंचपदी कोंडाबाई कांबळे यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:27+5:302021-02-13T04:19:27+5:30
निवडणूक अधिकारी ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी सरपंच पदासाठी कोंडाबाई कांबळे व उपसरपंच पदासाठी सुधाकर चव्हाण ...

केळगावच्या सरपंचपदी कोंडाबाई कांबळे यांची
निवडणूक अधिकारी ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी सरपंच पदासाठी कोंडाबाई कांबळे व उपसरपंच पदासाठी सुधाकर चव्हाण यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सदस्य वैभव पाटील, दीपक पाटील, अहिल्या राठोड, शीतल काळे, रुक्मिणीबाई काळे, ज्योती चव्हाण, शाहीन पांढरे, रंजना सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी यांच्यासह विजयकुमार पाटील, वीरेंद्र पाटील, बाबाभाई शेख, जगन सूर्यवंशी, एकनाथ काळे, शिवाजी राठोड, सुभाष कांबळे, माधव चव्हाण, प्रकाश चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य हरिभाऊ काळे, जिलानी देशमुख, लहू कांबळे, उत्तम सूर्यवंशी, अजित काळे, पिंटू पाटील, अंकुश काळे, धनराज काळे, रावसाहेब चव्हाण, अनंत कांबळे, दशरथ कांबळे, शिवाजी कांबळे, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक मुक्तापुरे, आदी उपस्थित होते.