वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:05+5:302021-06-30T04:14:05+5:30

पोलिसांचा पाठलाग : अहमदपूर शहरात खळबळ अहमदपूर : गत तीन आठवड्यांपासून अहमदपूर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, एका ज्येष्ठ ...

A knife to the neck of an elderly couple | वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू

वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू

पोलिसांचा पाठलाग : अहमदपूर शहरात खळबळ

अहमदपूर : गत तीन आठवड्यांपासून अहमदपूर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चारचाकी वाहन सोडून चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अहमदपूर येथील नागोबा नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवसांब शिवप्रसाद खकरे (५९) आणि पत्नी शीला राहतात. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास यांच्या घराचे दार लाथाबुक्क्यांनी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर चाकू ठेवत कपाटातील मंगळसूत्र, तीन तोळे बांगड्या, कानातील फुले, झुमके, सरपाळे, अंगठी, कानातील रिंग, चांदीचे कडे असा साडेचार लाखांचा ऐवज लुटून पाेबारा केला. दरम्यान, घडलेली घटना काेणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. खकरे यांचे घर लोकवस्तीपासून दूर असून, त्यांच्या घरावर पाळत ठेवत चोरट्यांनी सदरचा ऐवज लुटला. दरम्यान, चाकूर येथे मंगळवारी पहाटेच २ वाजता एका जवानाच्या घरावर दराेडा टाकल्याची माहिती अहमदपूर पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी नाकाबंदी केली. अहमदपूर येथील आयटीआय जवळ चोरांचा पाठलाग केला, मात्र कार सोडून चाेरट्यांनी पलायन केले.

याप्रकरणी अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: A knife to the neck of an elderly couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.