दयानंद कला महाविद्यालयात किशोरी मुर्के हिचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:38+5:302021-03-31T04:19:38+5:30
नजिउल्लाह शेख यांचा जिल्हा परिषदेत सत्कारलातूर : मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार केंद्रीय प्राथमिक ...

दयानंद कला महाविद्यालयात किशोरी मुर्के हिचा सत्कार
नजिउल्लाह शेख यांचा जिल्हा परिषदेत सत्कारलातूर : मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार केंद्रीय प्राथमिक शाळा, नांदगाव येथील शिक्षक नजीऊल्लाह शेख यांना जाहीर झाला.त्याबद्दल शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांच्या हस्ते समग्रशिक्षा अभियान विभागात शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत इटोलीकर, विवेक सौताडेकर, चंद्रकांत ठाकरे, दिलीप हैबतपूरे, मधूकर वाघमारे, राजाभाऊ सूर्यवंशी, रजिया शेख, डी.एस. माळकर, शंकर जाधव, सुरेखा सोनवणे, इमाम मुल्ला, महेश शिंदे,अंगद महानुरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नूतन शिवसेना पदाधिका-यांचा लातूरात सत्कार
लातूर : जिल्ह्यातील शिवसेनेच्या नूतन पदाधिका-यांचा माजी जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांच्या कार्यालयात मंगळवारी सत्कार करण्यात आला. यामध्ये रेणापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाणे, लातूर शहर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, लातूर ग्रामीण तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, लातूर शहरप्रमुख किसन समुद्रे यांचा समावेश होता. यावेळी युवासेना विस्तारक प्रा.सूरज दामरे, माजी नगरसेवक सुनील बसपुरे ,सतीश देशमुख, कैलास पाटील आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
धनंजय मोतेवार यांना पीएचडी प्रदान
लातूर : शहरातील विद्याविकास माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले धनंजय मोतेवार यांना नागपूर विद्यापीठाने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात पीएचडी प्रदान केली आहे.या यशाबद्दल डॉ. सत्यप्रकाश निकोसे, डॉ शालिनी लिहितकर, डॉ. मंगला हिरवाडे, डॉ बालाजी ढाकणे, डॉ.बी.आर. लोकलवार, डॉ. सिद्दीकी नईम, अविनाश बट्टेवार, प्रविण पोलावार, माधव रेनकोटवार, दत्तात्रय मोतीपवळे, एम.एम. कटके, अंकूश भंडे आदींनी कौतूक केले आहे.
थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन
लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडलास देण्यात आलेल्या मार्चच्या उदिष्टानुसार वीज बिलाच्या वसूलीचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या महावितरणची वसूली माेहीम सुरु आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने वीजबील भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्याकडे थकीत असलेल्या बीलाचा तात्काळ भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.