किल्लारी कारखान्याला गतवैभव मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:29+5:302021-06-19T04:14:29+5:30
कारखान्याचे अवसायक मंडळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना युतीचे आहे. हे सत्ताधारी पक्ष असल्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आशीर्वाद व ...

किल्लारी कारखान्याला गतवैभव मिळवून देणार
कारखान्याचे अवसायक मंडळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना युतीचे आहे. हे सत्ताधारी पक्ष असल्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आशीर्वाद व सल्ला घेऊन आम्ही हा कारखाना वाचविण्याचा ध्यास घेतला. कारखाना साइडवरील खुली जागा भाडेतत्त्वावर देऊन पैसा उपलब्ध करून व राज्य सहकारी बँकेचे कर्ज फेडून सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी व कारखाना पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रास्ताविक विजयकुमार सोनवणे यांनी केले. संचालक केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी कारखाना पुनर्वसनाचा प्रस्ताव मांडला. त्याला नानाराव भोसले याने अनुमोदन दिले. शेतक-यांच्या वतीने प्रकाश पाटील याने प्रस्तावाला पाठिंबा दिला. या सभेला संचालक गुंडाप्पा बिराजदार, डॉ. शंकरराव परसाळगे, कार्यकारी संचालक टी.एन. पवार, संतोष वाडीकर, रावसाहेब भोसले, गुलाब धानुरे, नानाराव भोसले, बंकटराव पाटील, संचालक बाबा पाटील, संचालक हराळकर, संचालक संजय पवार, विजयकुमार सोनवणे, विनोद बाबळसुरे, रमेश हेळंबे उपस्थित होते.