शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Killari Earthquake : घरे मिळाली पण मालकी रखडली, कागदपत्रांसाठी आजही शासन दरबारी खेटे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:24 IST

Killari Earthquake : साडेचौदा हजार घरे बांधली खरी पण कागदपत्रांसाठी आजही खेटेच!

आशपाक पठाण

लातूर :  भूकंपाच्या घटनेनंतर देश-विदेशातून अनेक सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. प्रशासनाने वर्गवारी करून तीव्रतेनुसार विविध भागांत घरांची उभारणी केली. सर्वाधिक घरांची उभारणी किल्लारी गावात करण्यात आली. नामांकित संस्थांनी या गावात २८६९ घरे बांधून दिली. याशिवाय शासन व अन्य सामाजिक संस्थांच्या मदतीने अ वर्गात १४ हजार ४०० तर ब वर्गवारीत ४ हजार ३०३ घरांची उभारणी करण्यात आली. या सर्व घरांचा ताबा संबंधितांना देण्यात आला आहे. मात्र ९१४ जण अजूनही कबाल्यासाठी प्रशासनाच्या दारात खेटे घालत आहेत. 

भूकंप पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत अ वर्गवारीच्या लातूर जिल्ह्यातील २७ गावांत शासनाने वाटप केलेल्या १३ हजार ५४८ घरांपैकी ३४३ घरांची मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाले) लाभार्थी कुटुंबांना देण्यात आली आहेत, तर ब वर्गवारीच्या दहा गावांतील शासन अनुदान व सेवाभावी संस्थांच्या वतीने बांधण्यात आलेल्या सरकारी जागेतील एकूण २ हजार २५३ घरांपैकी २ हजार १८८ घरांची मालकी (कबाले) देण्यात आली आहे. ब वर्गवारीत असलेल्या देवताळा, वरवडा, माळुंब्रा, जावळी, तांबरवाडी, लोहटा, उजनी, हिप्परगा, मुदगड एकोजी, दावतपूर या गावांत बांधण्यात आलेल्या घरांपैकी काही कुटुंबांचे कबाले अजूनही प्रलंबित आहेत. ब वर्गवारीतील ६५ व अ वर्गवारीच्या ८५२ घरांना अजूनही मालकी हक्काची प्रतीक्षा आहे. आपल्या घरांचा कबाला मिळावा यासाठी अनेकांचा संघर्ष २५ वर्षानंतरही सुरूच आहे. 

वारसा, अंतर्गत वादात रखडले कबाले... अ वर्गवारीत असलेल्या २७ गावांतील ८५२ घरांचे कबाले अद्याप दिलेले नाहीत. या ठिकाणी लाभार्थी कुटुंब वास्तव्यास आहेत. अनेकांच्या घरांत असलेला अंतर्गत वाद, वारसा हक्क यामुळे संबंधितांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी कौटुंबिक वाद असल्याने कबाले वाटपात अडचण निर्माण झाली आहे.  प्रशासनाने बांधलेल्या घरांपैकी एकही घर शिल्लक नाही. तांत्रिक अडचणीमुळे अ वर्गातील ८५२ तर ब वर्गातील ६५ घरांच्या कबाल्याचे प्रकरण प्रलंबित आहेत. कबाले देण्याबाबतच्या मागणीचा जोर वाढल्यानंतर आता शासनाने एक सर्वेक्षण हाती घेतले आहे़ प्रत्येक पुनर्वसित गावात तलाठ्यांमार्फत कबाले न मिळालेल्या बाधितांची यादी संकलित केली जात आहे़ यानंतरच नेमका आकडा समोर येईल.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर