शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
5
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
7
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
8
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
9
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
10
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
11
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
12
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
13
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
14
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
15
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
16
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
17
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
18
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
19
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
20
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:38 IST

भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला २-० ने दिली मात

महेश पाळणे, लातूर: खेळ कोणताही असो, भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, टशन आलेच. क्रिकेट खेळात तर हा सामना प्रत्येक भारतीयांचे लक्ष वेधतो. सध्या थायलंड येथे एशियन महिला चॅम्पियनशीपच्या पात्रता फेरीचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू असून गुरुवारी भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला २-१ ने मात दिली. या सामन्यात लातूरच्या बेसबॉलपटू ज्योती पवारची खेळी निर्णायक ठरली. विजयानंतर ज्योतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राग मनात धरून खेळी केल्याचे सांगत हा विजय मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना समर्पित केला.

थायलंड येथील बँकाॅक येथे महिलांच्या आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा सुरू असून ॲम्युच्युअर बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय महिला संघ या स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, इराण, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड व कंबोडिया अशा दहा संघांनी सहभाग नोंदविला असून भारताने शुक्रवारपर्यंत सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

५ व्या इनिंगपर्यंत स्कोअर बरोबर...

बेसबॉल खेळात ७ इनिंगचा सामना असतो. मात्र, ५ व्या इनिंगपर्यंत भारत व पाकिस्तानचा स्कोअर शून्य होता. ६ व्या इनिंगला लातूरच्यास ज्योतीच्या हिटवर एक रन मिळाला. ७ व्या इनिंगला पुन्हा पाकिस्तानने एक रन घेत बरोबरी साधली. सामना बरोबरीत असल्याने पुन्हा पंचाकडून दोन इनिंग वाढविण्यात आल्या. ८ वी इनिंगही बरोबरीत असल्याने ९ व्या राऊंडला ओडिसाच्या धरितत्रीने धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने २-१ अशी बाजी मारली. यात लातूरच्या ज्योती पवारची कलेक्शन व हिटिंग, पुण्याच्या रेश्मा पुणेकरची पिचिंग व धरितत्रीची उत्कृष्ट खेळी भारताला विजय मिळवून देणारी ठरली. तत्पूर्वी भारताने श्रीलंकेचा १५-४ तर इराणचा १३-० असा एकतर्फी धुव्वा उडविला.

गरिबीतून आली ज्योती पुढे...

यापूर्वी ज्योतीने दोनदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला असून पहिल्यावेळी या स्पर्धेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय व लातूरच्या रोटरी क्लबने आर्थिक मदत केली होती. दुसऱ्या स्पर्धेतही माजी आ. धीरज देशमुख, आ. रमेश कराड व रोटरी क्लबने मदत केली आहे. आताही स्पर्धेसाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा माजी आ. धीरज देशमुख यांनी तिला मदत करीत स्पर्धेसाठी पाठविले.

आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. यापेक्षा पाकिस्तानला पराभव करीत आम्ही पुढे गेलो, याचा आनंद आहे. पहलगाम येथील हल्ल्याचा राग मनात होता. खेळाने या भावना जिवंत ठेवत विजय साकार केला. हा विजय मयत निष्पाप लोकांना समर्पित करीत आहे.- ज्योती पवार, आंतरराष्ट्रीय बेसबॉलपटू

टॅग्स :laturलातूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान