कोरोना काळात डिस्टन्स ठेवा; डिस्कनेक्ट होऊ नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:56+5:302021-04-17T04:18:56+5:30
लातूर : आपल्या परिवारातील, मित्र, नातेवाइकांपैकी कोणीही कोरोनाबाधित असेल तर त्यांच्यापासून आपणाला काही काळ डिस्टन्स ठेवायचा आहे. परंतु, कोणत्याही ...

कोरोना काळात डिस्टन्स ठेवा; डिस्कनेक्ट होऊ नका !
लातूर : आपल्या परिवारातील, मित्र, नातेवाइकांपैकी कोणीही कोरोनाबाधित असेल तर त्यांच्यापासून आपणाला काही काळ डिस्टन्स ठेवायचा आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आपल्या जवळच्या माणसांपासून डिस्कनेक्ट होऊ नका. त्यांना मानसिक आधार द्या. शक्य ती मदत करा, असे आवाहन प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डाॅ. विठ्ठल लहाने यांनी केले आहे.
डाॅ. लहाने यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले, कोविड-१९ ही महामारी वर्ष उलटून गेले तरी जगाचा पिच्छा सोडत नाही. आपण सर्वजण मोठ्या मानसिक तणावातून जात आहोत. अशावेळी काही जण खूप घाबरून जातात, तर काहीजण एकदम बिनधास्त आहेत. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यात बिनधास्त राहणे अधिक चुकीचे आहे. गेल्यावर्षीच्या सुरुवातीला हा आजार नवीन होता. त्याची सर्वंकष माहिती नव्हती. पण आता वैज्ञानिक माहिती समोर आली आहे. त्याच्या आधारावर आपण निश्चितपणे या महामारीचा सामना यशस्वीरित्या करू शकतो, असे डाॅ. लहाने यांनी सांगितले. डिस्टन्स ठेवण्याबरोबरच मास्क वापरणे, स्वच्छ हात धुणे ही आजारावरची सर्वात उपयोगी लस असल्याचेही ते म्हणाले.
कोरोना बाधितांशी आपुलकीने वागा
nकुटुंबातील वा परिचितांपैकी कोणीही कोरोना पाॅझिटिव्ह असेल, तर सर्वप्रथम त्यांना धीर द्या. त्यांचा आत्मविश्वास वाढवा. व्हिडिओ काॅल करा. तुम्ही त्यांच्यासोबत आहात, हे सांगा. तुम्ही डाॅक्टरांच्या संपर्कात आहात आणि बाधिताची प्रकृती सुधारत आहे. कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वास समोरच्याला द्या, असेही डाॅ. विठ्ठल लहाने म्हणाले.
nआपण रुग्णांना भेटू शकत नाही, हे सत्य आहे. मात्र विविध माध्यमांद्वारे कनेक्टेड राहू शकतो.
nअनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंब बाधित आहे. त्यांना जवळच्यांनी कोविड नियमांचे पालन करून मदत पोहोचविली पाहिजे.