सेवालयाचे रवि बापटले यांच्यावर कत्तीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:25+5:302021-05-12T04:20:25+5:30

औसा तालुक्यातील हासेगाव येथे एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या सेवालयाचे प्रमुख रवि बापटले हे मंगळवारी सकाळी लातूरहून रुग्णवाहिकेतून ...

Katti attacked Ravi Bapatle of Sewalaya | सेवालयाचे रवि बापटले यांच्यावर कत्तीने हल्ला

सेवालयाचे रवि बापटले यांच्यावर कत्तीने हल्ला

औसा तालुक्यातील हासेगाव येथे एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या सेवालयाचे प्रमुख रवि बापटले हे मंगळवारी सकाळी लातूरहून रुग्णवाहिकेतून किराणा सामान घेऊन जात होते. दरम्यान, गावानजिक रस्त्यावर एकाने चारचाकी वाहन आडवे लावले होते. सदरील वाहन बाजूला काढण्याची त्यांनी चालकाला विनंती केली. यावेळी बापटले यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने चारजणांनी संगनमत करून मारहाण केली. एकाने गळ्यावर कत्तीने वार केला. त्यावेळी मी माझा डाव हात पुढे केल्याने हाताला जखम झाली आहे. तसेच दोघांनी डिझेलने भरलेल्या दोन बाटल्या माझ्या अंगावर ओतून याला जिवंत जाळून टाका, अशी चिथावणी दिली. मी आरडाओरड करीत असताना चौघांनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात मला टाकून माझे अपहरण करून ठार मारण्याच्या उद्देशाने गाडीत कोंबले. त्यावेळी मी आरडाओरड केली असता सेवालयातील कर्मचारी प्रकाश आडे यांनी त्या चार जणांच्या तावडीतून मला सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोकही पळत आले. मी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी गाडीतून उडी मारली. तेथून औसा पोलीस ठाणे गाठले. तक्रार दिल्यावर त्यांनी उपचारासाठी हासेगाव येथे पाठविले. तेथून प्रथमोपचार करून लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मला जिवे मारण्याच्या उद्देशाने कत्तीने वार करून अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार बापटले यांनी औसा पोलीस ठाण्यात केली आहे.

Web Title: Katti attacked Ravi Bapatle of Sewalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.