बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद; पाेलीस आईसाेबतचा संवाद वाढणार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST2021-09-27T04:21:22+5:302021-09-27T04:21:22+5:30
लातूर : पाेलीस दल आणि कामाचा ताण हे समीकरण गत अनेक वर्षांपासून झाले आहे; मात्र आता या समीकरणाला छेद ...

बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद; पाेलीस आईसाेबतचा संवाद वाढणार..!
लातूर : पाेलीस दल आणि कामाचा ताण हे समीकरण गत अनेक वर्षांपासून झाले आहे; मात्र आता या समीकरणाला छेद देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. पाेलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास बारावरुन आठ तास करण्यात आले आहेत. परिणामी, पाेलीस आईच्या मुला-बाळांच्या चेहऱ्यांवर आता आनंद ओसंडून वाहत आहे. यातून दरराेज आईसाेबतच्या गप्पा-टप्पा आणि संवाद वाढणार आहे.
महिला पाेलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयाने महिला कर्मचाऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. यातून त्यांच्यावर असलेल्या कामाचा ताण काही प्रमाणात कमी हाेण्याला मदतच हाेणार आहे. आता कुटुंबीयांना अधिकचा वेळ देता येणार आहे.
आता आईसाेबत राेजच वाढणार सहवास...
शाळा बंद असल्याने घरी राहून माेबाइल, टीव्ही बघत बसावे लागते. आई आता लवकर येणार आहे. आई ड्युटीवर असताना तिची वाट बघावी लागत हाेती. आता ही लवकर घरी येणार असल्याने आनंद हाेत आहे. - मुलगा
आईची बारा-बारा तास ड्युटी असल्याने माेठी दगदग हाेत हाेती. परिणामी, तिला घरात वेळ देता येत नव्हता; मात्र आता या निर्णयाने आईला वेळेत घरी येता येणार आहे. यातून आईसाेबतचा सहवास वाढणार आहे. ही बाब आमच्यासाठी आनंदाची आहे. - मुलगी
आई पाेलीस कर्मचारी आहे. सततचा ताणतणाव आणि वेळीअवेळी असलेल्या ड्युटीच्या वेळा याचा आम्हाला त्रास हाेत असे. आईला फारसा कुटुंबाकडे आमच्याकडे वेळ द्यायला मिळतच नव्हता. आता बारावरुन आठ तासावर आलेल्या कामाच्या वेळेने आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. - महिला पाेलीस कर्मचारी