जीपची दुचाकीला धडक; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:41+5:302021-02-05T06:23:41+5:30

फोनवर शिव्या दिल्या म्हणून मारहाण लातूर : तू फोनवर शिव्या का दिल्या, असे म्हणून बेल्टने तसेच चाकूने मारून फिर्यादीस ...

Jeep hits two-wheeler; Both injured | जीपची दुचाकीला धडक; दोघे जखमी

जीपची दुचाकीला धडक; दोघे जखमी

फोनवर शिव्या दिल्या म्हणून मारहाण

लातूर : तू फोनवर शिव्या का दिल्या, असे म्हणून बेल्टने तसेच चाकूने मारून फिर्यादीस जखमी केल्याची घटना उदगीर येथे घडली. फिर्यादी व चुलत भाऊ यशवंत सोसायटी ग्राऊंडवर मोबाईल पाहत असताना संगनमत करून आरोपींनी ही मारहाण केली, असे ज्ञानेश्वर संतोष बिराजदार (रा. तिरुपती सोसायटी) यांनी उदगीर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यानुसार वैभव बिरादार व अनोळखी तिघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आयटीआय कॉलेजपासून दुचाकीची चोरी

लातूर : आयटीआय कॉलेजच्या वाहनतळावर पार्किंग केलेल्या एमएच २४ एडी ६५७४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत लक्ष्मण अर्जुन बनसोडे (रा. गंगापूर, ता. लातूर, ह.मु. माऊलीनगर, पाखरसांगवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिरुर ताजबंद येथून दुचाकीची चोरी

लातूर : शिरुर ताजबंद येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ एडी ९९३८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत संदीप दशरथ बिरादार (रा. पाटोदा बु. ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञातावरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोहेकॉ सन्मुखराव तपास करीत आहेत.

दुचाकीच्या अपघातात एक जण जखमी

लातूर : आष्टामोड ते चाकूरदरम्यान जात असताना एमएच १२ एचक्यू ७२५३ या क्रमांकाच्या दुचाकीला भरधाव वेगात समोरून आलेल्या एमएच ३८ टी ६४४५ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने जोराची धडक दिली. यात फिर्यादीचा मुलगा जखमी झाला. डोक्याला, तोंडाला, छातीला मार लागला. दुचाकीचेही नुकसान झाले, असे राजेंद्र गोविंद वाघमारे (रा. सिद्धार्थनगर, चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच ३८ टी ६४४५ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सूर्यवंशी करीत आहेत.

रहदारीस अडथळा, एकाविरुद्ध गुन्हा

लातूर : द्राक्षाची हातगाडी रोडवर लावून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात पोकॉ लखन अशोक गोमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोहेल सत्तार बागवान (रा. मदनेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गोसावी करीत आहेत.

Web Title: Jeep hits two-wheeler; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.