जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:39+5:302021-02-27T04:25:39+5:30
जळकोट तालुका हा डोंगराळ भागात आहे. तालुक्यात एकूण ४७ गावे, वाडी-तांडे आहेत. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. तालुक्यातील ...

जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा
जळकोट तालुका हा डोंगराळ भागात आहे. तालुक्यात एकूण ४७ गावे, वाडी-तांडे आहेत. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. तालुक्यातील घोणसी सर्कल, गुत्ती, अतनूर, गव्हाण, मरसांगवी, डोंगरगाव, डोंगरकोनाळी, शिवाजीनगर तांडा, शेलदरा, उमरदरा, केकत सिंदगी, काटेवाडी, रावणकोळा, हळद वाढवणा अशी अन्य गावे व १५ ते २० तांडे डोंगरात वसलेले आहेत.
नैसर्गिकदृष्ट्या हा तालुका डोंगरी आहे. मात्र, अद्यापही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. डोंगरी तालुक्याचा दर्जा दिल्यास तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात आरक्षण मिळेल. नोकरीत आरक्षण मिळेल. वयोमर्यादेत आरक्षण मिळेल तसेच व्यवसायासाठी डोंगरीचा दर्जा फायदेशीर होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे. बनसोडे यांच्या या मागणीमुळे तालुक्यातील जनतेच्या आशा वाढल्या आहेत. जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून आपला प्रयत्न सुरू आहे, असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.