जळकोट- जांब- हळद वाढवणा शिव रस्त्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:26+5:302021-04-13T04:18:26+5:30
जळकोट तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्त्यासाठी १ कोटींचा निधी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर केला आहे. ...

जळकोट- जांब- हळद वाढवणा शिव रस्त्याच्या कामास प्रारंभ
जळकोट तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्त्यासाठी १ कोटींचा निधी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्यात शिव व पाणंद रस्त्याची कामे सुरू आहेत. जळकोट जांब ते हळद वाढवणा हा ७ किमीच्या शिवरस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना व त्या गावातील नागरिकांना लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना आपल्या शेतात बी- बियाणे, साहित्य नेण्यासाठी तसेच शेतातील राशी घरी आणण्यासाठी अडचण होत होती. आता या कामामुळे थेट बांधापर्यंत वाहन जाणार आहे.
यावेळी मारोती गबाळे, राम शिंदे, अहमद बागवान, सुनील काळे, धनंजय भ्रमण्णा, तुकाराम शिंदे, माधव शिंदे, शेषेराव धुळशेट्टे, विठ्ठल शिंदे, संभाजी धुळशेट्टे, माधव धुळशेट्टे, बाबुराव कमलापुरे, अशोक धुळशेट्टे आदी शेतकरी उपस्थित होते.