महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा यांच्या वतीने आयोजित शिक्षकरत्न व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष डी.बी.गुंडुरे होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष भारातबाई सोळुंके, पं.स. सभापती राधाताई बिराजदार, अंजली बोंडगे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी, डॉ.लालासाहेब देशमुख, जि.प.सदस्य संतोष वाघमारे, कुसुमताई हालसे, अरुणा बरमदे, पं.स.सदस्य रमेश जाधव, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पाराव शिंदे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, डी. एस.धुमाळ, शरद पेठकर, सुरेश बिराजदार, शेषेराव ममाळे, शिवहार स्वामी, विजयकुमार गुत्ते, गोविंद हंद्राळे, निलंगा तालुका जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. निलंगेकर म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी झाली आहे, मात्र शिक्षकांनी ग्रामीण भागातून समाजप्रबोधन करून लोकांना कोरोना संसर्ग रोगाच्या नियमाचे पालन करायला लावणे आवश्यक आहे. तरच तिसरी लाट थोपवता येईल असे सांगून शिक्षकांनी कोरोना संसर्गाच्या काळात कोरोना योद्ध्याची चांगली भूमिका निभावल्याचे सांगितले. बाला उपक्रमांतर्गत झालेल्या कामाचे कौतुक करत त्यासाठी निधी कमी पडत असेल तर आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा विकासाचा पॅटर्न आपण पुढे घेऊन जाणार असेही ते म्हणाले.
यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रतिनिधी सुनील मुळे व महिला शिक्षक प्रतिनिधी सीमा उमरे यांनी आपले विचार मांडले. यावेळी ५० शिक्षकरत्न व २० जिल्हा परिषद उपक्रमशील शाळेला पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बी.एस.सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचलन एम. एम.जाधव, पी.जी.सराटे व आभार आनंद जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.पी.बिराजदार, किरण धुमाळ,व्ही.एम.चांभारगे, एस.जी. बामणे, उमाकांत म्हेत्रे, माणिक बिराजदार, अंबादास पिचरुटे, श्रीमती राजश्री शिंदे, रमेश कोळसुरे, शिवाजी भदरगे, अंजली सूर्यवंशी, रत्ना हातागळे, अर्चना मोरे, सोमनाथ काळगे, प्रशांत इंगळे, एस. टी. सूर्यवंशी, सत्यप्रकाश दरेकर, शिवाजी सूर्यवंशी, डी.डी.बाबळसुरे,राहुल कांबळे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.