आंतरराज्य बसेसची सेवा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST2021-06-21T04:14:59+5:302021-06-21T04:14:59+5:30
लातूर : कोरोनामुळे आंतरराज्य बससेवा ठप्प होती. निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू झाली असून, आता सोमवारपासून ...

आंतरराज्य बसेसची सेवा आजपासून
लातूर : कोरोनामुळे आंतरराज्य बससेवा ठप्प होती. निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू झाली असून, आता सोमवारपासून आंतरराज्य बससेवाही सुरू केली जाणार आहे. त्यानुसार लातूर येथून गुलबर्गा, हैदराबाद, निजामाबाद, बीदर, भालकी आदी मार्गांवरून बसेस धावणार आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आंतरराज्य बससेवा बंद होती. कोरोना काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जिल्हांतर्गत बससेवा सुरू होती. त्यानंतर निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक सुरू झाली. आता आंतरराज्य बससेवेला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. हैदराबाद, गुलबर्गा, निजामाबाद, बीदर, भालकी या सर्व मार्गांवर पूर्वीच्या वेळेनुसार बसेस धावणार आहेत. लातूर बसस्थानकातून हैदराबाद ही गाडी दिवसातून तीनवेळा सुटणार आहे. उदगीर बसस्थानकातूनही आंतरराज्य बससेवा नियमितप्रमाणे सुरू राहणार आहे. जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील बससेवेला सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने आंतरराज्य बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या बसेस धावणार असल्याचे लातूरचे आगार व्यवस्थापक जाफर कुरेशी यांनी सांगितले.