संभाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:23+5:302021-09-14T04:24:23+5:30

डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन म्हणाले, प्राचीन भारतीय व्यवस्थेमध्ये संसाधन व्यवस्थापन विषयाची बरीचशी सुधारणा होती. परंतु काळाच्या ओघात त्याचा विसर ...

International e-conference at Sambhaji College | संभाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

संभाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन म्हणाले, प्राचीन भारतीय व्यवस्थेमध्ये संसाधन व्यवस्थापन विषयाची बरीचशी सुधारणा होती. परंतु काळाच्या ओघात त्याचा विसर सद्य परिस्थितीत पडल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय परिषदा ग्रामीण भारतात व जागतिक स्तरावर घेणे अत्यंत गरजेचे आहे. या परिषदेत डॉ. प्रवीण सप्तर्षी, यांनी भारतीय तरुणांनी संशोधनात अभिरुची दाखविणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा फायदा शेती विकास व व्यवस्थापनात होईल, असे मत व्यक्त केले. परिषदेत डॉ. हाजी मोहम्मद आजहम तुल्ला, डॉ. एस डी. शिंदे, डॉ. एफ.एम. नदाफ, डॉ. एच. बी. तीपे, डॉ. संदीप राऊत यांनी मार्गदर्शन केले. परिषदेसाठी १९० संशोधन लेख आले. संशोधन लेखाचे वाचन डॉ. अर्जुन ननावरे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन जी. माळी यांनी केले. अध्यक्षीय समारोप ॲड. व्ही. वाय. पाटील यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. एम. बी. गायकवाड यांनी केले. तर आभार डॉ. जी. एल. जाधव यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील आयोजक समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. संतोष माने व प्रा. डॉ. संगमेश्वर धाराशिव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: International e-conference at Sambhaji College