जळकोटातील ठेकेदारास केल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:57+5:302020-12-05T04:31:57+5:30
भारत राठोड हे यापूर्वी उदगीर पालिकेचे मुख्याधिकारी होते. त्यांनी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्याकडून २७ नोव्हेंबर रोजी जळकोट येथील नगरपंचायतीच्या ...

जळकोटातील ठेकेदारास केल्या सूचना
भारत राठोड हे यापूर्वी उदगीर पालिकेचे मुख्याधिकारी होते. त्यांनी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्याकडून २७ नोव्हेंबर रोजी जळकोट येथील नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली आहेत. प्रारंभी राठोड यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली. त्यानंतर सफाई कामाचे टेंडर असलेल्या ठेकेदारांना सूचना केल्या. तसेच माजी नगरसेवक, शहरातील प्रमुख विविध संघटनांच्या नागरिकांकडून शहरातील विविध प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले.
शहरातील सर्व रस्त्यांची, नाल्यांची साफसफाई करण्यावर भर दिला आहे. श्री गुरुदत्त महाविद्यालय ते ग्रामीण रुग्णालय परिसर, महादेव मंदिर परिसरास भेटी देऊन पाहणी केली. तेथील कचरा पाहून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यामुळे शहर चकाचक होण्यास सुरुवात झाली आहे.
नागरिकांतून समाधान...
जळकोट नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर काही मोजक्याच मुख्याधिका-यांनी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी राठोड यांनी स्वच्छता, पाणी, आरोग्य, शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
***